शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

CoronaVirus ठाण्यात पॉझिटिव्ह महिलेची डिलिव्हरी; मायलेकांची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 6:34 PM

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त महिलेची दुसरी डिलिव्हरी 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड 19 पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन (शस्त्रक्रिया) डिलिव्हरीची घटना ताजी असताना, शनिवारी पहाटे आणखी एका कोविड 19 पॉझिटिव्ह महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली असून या महिलेने 3.5 किलो वजनाच्या एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्या मायलेकांची प्रकृती स्थिर असून त्या नवजात बालकाचा लवकर स्वॅब घेण्यात येईल अशी माहिती त्या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.          गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता कल्याण येथील 25 वर्षीय कोविड 19 पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन डिलिव्हरी केली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तसेच बुधवारी कोविड 19 पॉझिटिव्ह म्हणून ठाण्याच्या इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या एका 27 वर्षीय महिलेला उपचारार्थ दाखल केले होते. त्यातच ती गर्भवती असल्याने डॉक्टरांकडून तिच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. अचानक शनिवारी पहाटे त्या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या.त्यानुसार त्या महिलेला डिलिव्हरीसाठी वॉर्डात घेतल्यावर तिची पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नॉर्मल डिलिव्हरी झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून ही कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण महिलेची दुसरी जिल्ह्यातील डिलिव्हरी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. डिलिव्हरीनंतर त्या दोन्ही बालकांना मातेचे स्तनपान सुरू केले असून पहिल्या जन्माला आलेल्या मुलीची कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेतला असून आज जन्माला आलेल्या बालकाचा स्वॅब लवकरच घेतला जाईल असे डॉक्टरांनी सांगितले. तर ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलाश पवार आणि फिजिशियन डॉ.नेताजी मुळीक,डॉ सृजित शिंदे,डॉ.प्रसन्ना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉ.अर्चना आखाडे यांनी ही डिलिव्हरी केलीअसून यावेळी डॉ शोभना चव्हाण,डॉ. प्रसाद भंडारी, परिचारिका शबनम शिंदे,मिलिंद पवार,सुखदा वैश्यपायन,मुमताज शेख,मेधा जबडे आदी उपस्थित होत्या. 

प्रसूती तसेच डायलेसिस याचे रुग्ण येण्याची शक्यता ओळखून रुग्णालयात त्याप्रमाणे सोई सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यानुसार शनिवारी दुसरी डिलिव्हरी करण्यात आली असून बाळ-बाळंतिणीची प्रकृती स्थिर आहे.तसेच ही जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त महिलेची ही दुसऱ्या डिलिव्हरी असून ती डिलिव्हरी नॉर्मल केली आहे.-डॉ.कैलाश पवार,जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस