शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Coronavirus Death toll: कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी माणसं साथीपासून दूर; रीतीप्रमाणे अंत्यविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 01:12 IST

घरातील व्यक्ती गेल्याची भावना

अजित मांडकेठाणे  : गेले वर्षभर कोरोनाचा कहर सुरू असून, ठाण्यातील चार स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करणारी माणसे या महामारीपासून दूरच असल्याचे दिसून आले आहे. चार स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सुमारे ४९ पैकी केवळ दोनचजणांना सुरुवातीच्या काळात कोरोना झाला होता. परंतु, त्यानंतर अद्याप एकालाही त्याची लागण झालेली नाही. असे असतानाही एखाद्या घरच्याप्रमाणेच कोरोनाग्रस्तांवर ते अंत्यसंस्कार करीत आहेत. 

ठाणे शहरात आजघडीला ६८ हजार ८५२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील ६३ हजार २०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; तर आतापर्यंत एक हजार ४२६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूचे प्रमाण कमी असले तरीदेखील मनात भीती कायम आहे. ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला ५४ च्या आसपास स्मशानभूमी आहेत. त्यातील वागळे, जवाहरबाग, कळवा आणि येऊर येथे असलेल्या स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यातही जवाहरबाग स्मशानभूमी ही ठाण्यातील सर्वात मोठी असल्याने तिथे अंत्यविधीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे येथे तीन शिफ्टमध्ये २४ कर्मचारी कार्यरत आहेत, तर वागळे, कळवा येथे १२ आणि येऊर येथे एक कर्मचारी कार्यरत आहे.  या सर्वांच्या खांद्यावर कोरोनाला सुरुवात झाल्यापासून मोठी जबाबदारी पडली आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला उचलण्यापासून त्याच्यावर रितसर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीदेखील त्यांच्याच खांद्यावर आहे. हे करीत असताना स्वत:च्या जिवाची काळजी घेण्याचे कामही त्यांना करावे लागत आहे.

परंतु, एखाद्यावर अंत्यसंस्कार करताना जो आपल्या घरातीलच असल्याचेसारखे अगदी रितीरिवाजाप्रमाणे अंत्यविधी केले जात आहेत. त्यामुळे अनेकांची मनेदेखील यामुळे पिळवटून निघाली आहेत. परंतु, मनावर दगड ठेवून ते आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यातूनच वर्षभरात केवळ दोनजणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट घालणे, वारंवार हात सॅनिटाईज करणे आदी काळजी हे कर्मचारी घेत आहेत. तसेच घरी जाण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करणे आणि घरी गेल्यानंतरही पुन्हा गरम पाण्याने अंघोळ करणे असा दिनक्रम या कर्मचाऱ्यांचा सुरू आहे. परंतु, घरातदेखील सर्वांपासून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच ते वास्तव्य करीत असल्याचे सांगतात.

आम्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर रितसर अंत्यसंस्कार करीत असतो. ते करीत असताना कधीकधी मन घट्ट करावे लागते. तसेच आमच्या घरच्यांसह स्वत:चीदेखील काळजी घेतो. अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, घरी जाण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करणे तसेच घरी गेल्यानंतरही पुन्हा अंघोळ करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घरात वावरणे, असा नित्यक्रम ठरला आहे. - जितू मकवाना, स्मशानभूमीतील कर्मचारी

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस