शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

Coronavirus: कोरोनामुळे केडीएमसीला बसला फटका; उत्पन्न ९०० कोटींनी घटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 23:50 IST

३ सप्टेंबरला होणार ऑनलाइन महासभा

कल्याण : केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनातर्फे अर्थसंकल्प सादर करताना एक हजार ९९७ कोटी रुपये उत्पन्न तर, खर्चाची एक हजार ९९६ कोटी रुपये बाजू दर्शवली होती. मात्र, कोरोनाचा फटका मनपाच्या अपेक्षित उत्पन्नास बसणार असल्याने ५० टक्केच गंगाजळी तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास ९०० कोटींचा फटका मनपास बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूर्यवंशी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीने चर्चा करून त्यात फेरबदल केले होते. स्थायीचे सभापती महासभेला अर्थसंकल्प सादर करणार होते. मात्र, कोरोनामुळे पाच महिने महासभा झालेली नाही. त्यामुळे महासभेपुढे अर्थसंकल्प स्थायीकडून सादर होऊन तो मंजूर झालेला नाही. ३ सप्टेंबरला आॅनलाइन महासभा होणार असून, त्यात स्थायीचे सभापती अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

कोविडमुळे नव्या बांधकामांना परवानगी देण्याचे काम संथगतीने सुरू आहे. मजुरांअभावी तसेच आर्थिक फटका बसल्याने गृहप्रकल्प रखडले आहेत. बिल्डरांनीही नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव मनपाकडे मंजुरीसाठी पाठवलेले नाहीत. परिणामी, विकास शुल्कापोटी मिळणारी रक्कम मनपाला मिळालेली नाही. दुसरीकडे महापालिकेस सरकारकडून मिळणाऱ्या निधीत कपात करण्यात आली आहे. मनपा हद्दीत घर खरेदीविक्री होत नसल्याने मनपाला मुद्रांक शुल्कापोटी मिळणारा निधी मिळालेला नाही.

दुसरीकडे राज्य सरकारने मनपा हद्दीतून १८ गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे या गावांतून मालमत्ता व पाणीपट्टी बिलापोटीचा मिळणारा महसूलही ठप्प झाला आहे. मनपाचे प्रथम प्राधान्य हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावर आहे. त्यामुळे करवसुलीवर परिणाम झाला आहे.विकासकामांवरही होणार परिणामकेडीएमसीकडून यंदाच्या आर्थिक वर्षात एक हजार ९९६ कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार होती. मात्र, उत्पन्नात ५० टक्के घट होणार असल्याने काही कामे करणे मनपास शक्य होणार नाही. महापालिकेत २०१६ पासून उत्पन्न आणि खर्चाच्या दरम्यान ३०० कोटींची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी तत्कालीन आयुक्त पी. वेलारासू यांनी ३०० कोटींच्या विकासकामांना कात्री लावली होती. तेव्हापासून कामे होत नसल्याची ओरड नगरसेवकांकडून होत आहे. यंदाही अपेक्षित उत्पन्न व खर्चात भली मोठी तूट होणार असल्याने पुन्हा यांच्याकडून ओरड होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस