शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

coronavirus: कोरोनाचा कहर, केडीएमसी हद्दीत १.०८ टक्क्यांनी वाढला मृत्युदर, एकूण मृत्युदर २.१७ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 2:28 AM

केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली.

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोनाचा कहर सुरूच असून, रुग्णसंख्या ३० हजारांवर पोहोचली आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के असले, तरी मृत्युदर मागील काही महिन्यांच्या तुलनेत १.०८ टक्क्यांनी वाढला आहे. आधी १.०९ टक्के असलेला मृत्युदर सध्या २.१७ वर पोहोचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत केडीएमसी हद्दीतील मृत्युदर कमी असल्याचा दावा मनपाच्या आरोग्य विभागाने केला आहे.केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. १४ मार्च ते ८ जूनपर्यंत रुग्णांची संख्या एक हजार ५६२ होती. तर, यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जूनअखेरीस ही संख्या पाच हजार १३ ने वाढून सहा हजार ५७५ वर पोहोचली. तर, मृतांची संख्या १२० झाली. सुरुवातीला प्रतिदिन दोनचार रुग्णांचे मृत्यू व्हायचे. त्यावेळी मृत्युदर हा १.०९ टक्के होता. परंतु, अनलॉक झाल्यापासून कोरोनामुळे दररोज सरासरी नऊ ते ११ दरम्यान मृत्यू होत आहेत. परिणामी, मृत्युदर २.१७ टक्क्यांवर गेला आहे. ३ सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या ३० हजार ५४ पर्यंत गेली आहे. सध्या तीन हजार २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, २६ हजार ११२ रुग्ण उपचाराअंती बरे झाले असले तरी, आतापर्यंतची मृतांची संख्या ६५६ झाली आहे.केडीएमसी हद्दीत उपचार घेणाऱ्या रुग्णांबरोबरच मनपा हद्दीतील जे रुग्ण मुंबईसह उपनगरांत उपचार घेत आहेत, त्यांचाही मृत्यूनंतर केडीएमसीच्या संख्येत समावेश होत आहे. तर, अनलॉक आणि नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्याने सध्या रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.कोरोनाची लक्षणे आढळलेले रुग्ण वेळेवर कोरोनाची चाचणी करीत नाहीत. डेंग्यू आणि मलेरिया झाल्याचा समज करून कोरोनाची चाचणी करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाची बाधा झालेला रुग्ण पुढे गंभीर बनतो आणि पुढे त्याला अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागतात. जर, त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तसेच डायलेसिस करावे लागत असेल, तर गंभीर अवस्थेतील रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो. हेच कारण मृतांची संख्या वाढण्यामागे असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.वेळीच उपचार घेतले तर कोरोना बरा होतो, कोरोनाचे निदान करण्यासाठी अ‍ॅण्टीजेनसारख्या मोफत चाचण्या केडीएमसीकडून सर्वत्र होत आहेत. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. तसेच उपचारासाठी येणाºया तापाच्या रुग्णांना कोरोना चाचणी करण्यासंदर्भात सूचना फॅमिली डॉक्टरांनी कराव्यात, असे आवाहन केडीएमसीच्या साथरोग प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे