शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Coronavirus : मीरा -भाईंदरमध्ये कोरोनाचा दुसरा बळी; एकाच दिवसात ७ नवे रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 10:38 PM

५८ व २८ वर्षांचे पुरुष तर ५७ वर्षांची महिला कोरानाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.

मीरारोड - मीरा-भाईंदरमध्ये आज गुरुवारी कोरोनाने दुसरा बळी घेतला. मीरा रोडच्या ७५ वर्षाच्या वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर शहरात कोरोनाचे नवीन ७ रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या २९ झाली आहे. मीरा रोडच्या नित्यानंद नगरमधील गंगासागर येथे राहणाराया ७५ वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. सदर महिलेच्या कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या त्या संपर्कात आल्या होत्या. या शिवाय भाईंदरच्या गोडदेव गावातील साई चरण इमारतीत अणखी तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. ५८ व २८ वर्षांचे पुरुष तर ५७ वर्षांची महिला कोरानाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.नयानगरच्या पूजानगरमध्ये आणखी एक ७४ वर्षांची महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. मंगळवारी याच पूजा नगरमध्ये राहणा-या ५० वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. नया नगरमधील ५० वर्षाच्या इसमास कोरोनाची लागण झाली असून, तो आखाती देशातून आलेला आहे. मीरारोडच्या विनय नगरमध्ये राहणा-या ३२ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. तिच्या ५६ वर्षीय सासूला आधीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९ झाली असून, ५३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल अजून यायचे आहेत. २९ पैकी २ रुग्णांचा मृत्यु तर २ रुग्ण बरे झालेले आहेत.त्यामुळे शहरात कोरोनाचे सध्या २५ रुग्ण असून १५१ जणांची कोरोना चाचणी केली असता, त्यात ७५ जणांचे निगेटिव्ह , २३ जणांचे पॉझिटिव्ह तर ५३ जणांचे अहवाल अजून यायचे आहेत. पालिकेच्या अलगीकरण केंद्रात ६३ जणं तर घरीच अलगीकरण ठेवलेल्यांची संख्या ४६६ इतकी आहे. भाईंदर येथील जोशी रुग्णालयात ५४ जणांना ठेवलेले आहे. यात काही कोरोनाचे रुग्ण तर काही अहवाल प्रलंबित असल्याने ठेवलेली लोकं आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस