शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडली ४० हजारांची वेस, ठाणे शहर १० हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 5:17 AM

ठाणे : शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १९४८ कोरोना बाधितांसह ४५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार ५४२ ...

ठाणे : शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १९४८ कोरोना बाधितांसह ४५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार ५४२ तर मृतांचा आकडा १२२१ झाला. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे.शनिवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक ५५५ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ६०४ तर, मृतांची १३५ झाली. ठाणे महानगरपालिका हद्दीत ४०८ बाधितांसह १७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे बाधितांची संख्या १० हजार ३५८ तर मृतांची ३८६ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत १५७ नव्या रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या सात हजार ८५९ तर मृतांचा आकडा २३९ वर पोहोचला. मीरा -भार्इंदरमध्ये १२६ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या चार हजार ११ तर मृतांची १५८ पोहचली. भिवंडीत ७७ बाधितांसह एका मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या दोन हजार २५० तर मृतांची ११९ वर पोहोचली. उल्हासनगरात २१२ नव्या रुग्णांसह तिघांचा मृत्य झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ५५९ तर मृतांची ५२ झाली. अंबरनाथमध्ये ९४ नवे रुग्ण सापडले असून एकाचा या मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार १२६ तर मृतांची ५८ झाली आहे. बदलापूरमध्य ४६ रुग्णांसह एकाचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या ९५२ झाली आहे. तर ठाणे ग्रामीण भागात १७३ रुग्णांसह चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८० तर मृतांचा आकडा ५८ पोहचला आहे.रायगड जिल्ह्यात एका दिवशी २६१ रुग्णअलिबाग : जिल्ह्यात शनिवारी २६१ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी बाधित रुग्णांची संख्या ४,९२४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला.शनिवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १२३, पनवेल ग्रामीणमध्ये ४६, उरण १३, अलिबाग ००, कर्जत ०३, पेण २३, खालापूर १७, माणगाव ०४, रोहा ०८, मुरुड ०२, म्हसळा ०८, पोलादपूर ०१, सुधागड ०१ असे एकूण २६१ कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आले. तर दिवसभरात पनवेल मनपा- ६३, पनवेल ग्रामीण- ४९, उरण- ६, कर्जत-०९, मुरुड-०१, तळा-०१, रोहा-०१, सुधागड-००, श्रीवर्धन-०६ असे एकूण १३६ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी २७७४ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १४९ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २१५० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.नवी मुंबईमध्ये सात जणांचा मृत्यूनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात शनिवारी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या २३९ झाली आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तीन टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. शनिवारी ऐरोली व दिघामध्ये प्रत्येकी दोन व तुर्भे, बेलापूरसह घणसोलीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.च्आतापर्यंत तुर्भेमध्ये ५०, बेलापूरमध्ये २४, नेरुळमध्ये २६, वाशीमध्ये २२, कोपरखैरणेमध्ये ४३, घणसोलीमध्ये २५, ऐरोलीमध्ये ३४ व दिघामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी २५७ रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णांची संख्या ७,६०२ झाली आहे. १५० रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, आतापर्यंत ४,२६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे