coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडली ४० हजारांची वेस, ठाणे शहर १० हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 05:17 AM2020-07-05T05:17:03+5:302020-07-05T05:17:09+5:30

ठाणे : शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १९४८ कोरोना बाधितांसह ४५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार ५४२ ...

coronavirus: Corona patients cross 40,000 mark in Thane district, Thane city crosses 10,000 gates | coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडली ४० हजारांची वेस, ठाणे शहर १० हजार पार

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडली ४० हजारांची वेस, ठाणे शहर १० हजार पार

Next

ठाणे : शनिवारी जिल्ह्यात दिवसभरात १९४८ कोरोना बाधितांसह ४५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४० हजार ५४२ तर मृतांचा आकडा १२२१ झाला. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे.
शनिवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक ५५५ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या आठ हजार ६०४ तर, मृतांची १३५ झाली. ठाणे महानगरपालिका हद्दीत ४०८ बाधितांसह १७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे बाधितांची संख्या १० हजार ३५८ तर मृतांची ३८६ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत १५७ नव्या रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या सात हजार ८५९ तर मृतांचा आकडा २३९ वर पोहोचला. मीरा -भार्इंदरमध्ये १२६ रुग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या चार हजार ११ तर मृतांची १५८ पोहचली. भिवंडीत ७७ बाधितांसह एका मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या दोन हजार २५० तर मृतांची ११९ वर पोहोचली. उल्हासनगरात २१२ नव्या रुग्णांसह तिघांचा मृत्य झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ५५९ तर मृतांची ५२ झाली. अंबरनाथमध्ये ९४ नवे रुग्ण सापडले असून एकाचा या मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार १२६ तर मृतांची ५८ झाली आहे. बदलापूरमध्य ४६ रुग्णांसह एकाचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या ९५२ झाली आहे. तर ठाणे ग्रामीण भागात १७३ रुग्णांसह चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या दोन हजार ८० तर मृतांचा आकडा ५८ पोहचला आहे.

रायगड जिल्ह्यात एका दिवशी २६१ रुग्ण

अलिबाग : जिल्ह्यात शनिवारी २६१ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी बाधित रुग्णांची संख्या ४,९२४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झाला.
शनिवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १२३, पनवेल ग्रामीणमध्ये ४६, उरण १३, अलिबाग ००, कर्जत ०३, पेण २३, खालापूर १७, माणगाव ०४, रोहा ०८, मुरुड ०२, म्हसळा ०८, पोलादपूर ०१, सुधागड ०१ असे एकूण २६१ कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आले. तर दिवसभरात पनवेल मनपा- ६३, पनवेल ग्रामीण- ४९, उरण- ६, कर्जत-०९, मुरुड-०१, तळा-०१, रोहा-०१, सुधागड-००, श्रीवर्धन-०६ असे एकूण १३६ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी २७७४ रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १४९ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २१५० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नवी मुंबईमध्ये सात जणांचा मृत्यू
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात शनिवारी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या २३९ झाली आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तीन टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. शनिवारी ऐरोली व दिघामध्ये प्रत्येकी दोन व तुर्भे, बेलापूरसह घणसोलीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
च्आतापर्यंत तुर्भेमध्ये ५०, बेलापूरमध्ये २४, नेरुळमध्ये २६, वाशीमध्ये २२, कोपरखैरणेमध्ये ४३, घणसोलीमध्ये २५, ऐरोलीमध्ये ३४ व दिघामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी २५७ रुग्ण वाढले असून, एकूण रुग्णांची संख्या ७,६०२ झाली आहे. १५० रुग्ण दिवसभरात बरे झाले असून, आतापर्यंत ४,२६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: coronavirus: Corona patients cross 40,000 mark in Thane district, Thane city crosses 10,000 gates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.