coronavirus: मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांचा हजाराचा आकडा पार, दिवसभरात आणखी 4 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 10:53 PM2020-06-08T22:53:59+5:302020-06-08T22:54:24+5:30

महापालिकेने कोरोना रुग्णां बाबत सोमवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार शहरात कोरोनाचे आणखी 4 बळी तर नवीन 46 रुग्ण आढळून आले आहेत .

coronavirus: Corona crosses thousands in Mira Bhayandar, 4 more die in a day | coronavirus: मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांचा हजाराचा आकडा पार, दिवसभरात आणखी 4 जणांचा मृत्यू 

coronavirus: मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांचा हजाराचा आकडा पार, दिवसभरात आणखी 4 जणांचा मृत्यू 

Next

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोना रुग्णांचा एक हजाराचा आकडा पार होऊन शहरात 1021 इतकी संख्या झाली आहे . तर बळींची संख्या देखील रोज वाढत असून आज आणखी 4 जणांचा मृत्यू झालेला असून एकूण मृतांची संख्या 59 वर पोहचली आहे . 

महापालिकेने कोरोना रुग्णां बाबत सोमवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार शहरात कोरोनाचे आणखी 4 बळी तर नवीन 46 रुग्ण आढळून आले आहेत . मीरारोड भागातील 15 तर भाईंदर भागातील 31 रुग्ण आहेत .  अजून 319 जणांचा कोरोना चाचणी अहवाल यायचा बाकी आहे . दिवस भरात 18 रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 634 इतकी झाली आहे . त्यामुळे शहरात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 328 इतके आहेत.

Web Title: coronavirus: Corona crosses thousands in Mira Bhayandar, 4 more die in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.