Coronavirus: डोंबिवलीत कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांचे आंदोलन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 09:36 AM2020-05-04T09:36:26+5:302020-05-04T09:36:39+5:30

आता सांगा कसं काम करायचं, असा सवाल करत कंत्राटी सफाई कामगारांनी केले आंदोलन सुरू केले आहे.

Coronavirus: Cleaning worker agitation on garbage issue in Dombivali vrd | Coronavirus: डोंबिवलीत कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांचे आंदोलन सुरू

Coronavirus: डोंबिवलीत कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांचे आंदोलन सुरू

Next

डोंबिवलीः आम्हाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही, सुरक्षा नाही, आमच्या कुटुंबाला काही झाले तर जबाबदार कोण? तसेच कचऱ्याचे वर्गीकरण नागरिक करत नाहीत, तर आम्ही शेकडो टन असलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करणार तरी कसे?, उंबर्डे गावात कचरा टाकायला गेल्यास आम्हाला, आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण होत आहे. आता सांगा कसं काम करायचं, असा सवाल करत कंत्राटी सफाई कामगारांनी केले आंदोलन सुरू केले आहे.
आधारवाडी डम्पिंग बंद करण्याचा निर्णय जरी चांगला असला तरी आधी जमा होणारा कचरा नेमका टाकायचा कुठं, याचे नियोजन करणे गरजेचे आहे. केडीएमसी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असून, आमचा जीव आम्ही का धोक्यात घालू, असा सवाल करत कर्मचारी आंदोलन करण्यावर ठाम आहेत. आधी कचरा कुठे टाकायचा याचा निर्णय घ्या, आमची सुरक्षा बघा आणि मग कामाला सुरुवात होईल, असा पवित्रा कंत्राटी कामगारांनी घेतला आहे.

Web Title: Coronavirus: Cleaning worker agitation on garbage issue in Dombivali vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.