शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Break The Chain : ठाण्यातील अत्यावश्यकसह इतर दुकाने १ जूनपासून उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 18:22 IST

ठाणे  महापालिकेची स्वतंत्र नियमावली जाहीर. महानगपालिकेनं वेळ दिली ठरवून

ठळक मुद्देठाणे  महापालिकेची स्वतंत्र नियमावली जाहीर.महानगपालिकेनं वेळ दिली ठरवून

ठाणे  : राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्वाढीचा दर हा १० टक्यांपेक्षा कमी असेल अशा ठिकाणी महापालिकांची स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने पावले उचलली असून निर्बंधांसंदर्भात स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मॉल, शॉपिंग सेंटर वगळता इतर आस्थापना १ जूनपासून म्हणजेच मंगळवार पासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेर्पयत खुली ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आला आहे. परंतु शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर आस्थापना या बंद ठेवण्यात येतील असेही स्पष्ट केले आहे. याशिवाय हॉटेल सुरु राहणार असली तरी त्यांच्याठिकाणी पार्सलची सुविधा असणार आहे.ठाणे  महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून रुग्ण वाढीचा दर हा खाली आलेला दिसत आहे. राज्य शासनाने ज्या शहरांचा रुग्णवाढीचा दर हा १० टक्यांपैक्षा कमी असेल त्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घ्यावे असे सूचित केले आहे. त्यानुसार ठाणे शहरातील रुग्ण वाढीचा दर हा मागील आठवडा भरात ७.८५ टक्यांच्या आसपासच दिसून आला आहे. आतार्पयत अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरु होती. परंतु आता त्या दुकानांसोबतच इतर आस्थापना म्हणजे कपडा, भाजी मार्केट, ज्वेलर्स, कटींग सलुनची दुकाने आदींसह इतर आस्थापना या सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहणार असल्याचे आदेश पारीत केले आहेत. त्याची अंमलबजावणी १ जून पासून केली जाणार आहे. 

दरम्यान, या आदेशातून मॉल्स वगळण्यात आलेले आहेत, त्यांना आपल्या आस्थापना सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय छोट्या स्वरुपातील हॉटेल सुरु राहतील. परंतु त्यांना ७ ते २ अशी असणार असून पार्सलची सुविधा असणार आहे. तसेच मोठी हॉटेल, रेस्टॉरेन्टमध्ये पुर्वी प्रमाणोच पार्सलची सेवा उपलब्ध असणार आहे. तसेच दुपारी २ नंतर केवळ मेडीकल दुकाने सुरु राहणार आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थिती ही २५ टक्के असणार आहे. होम डिलिव्हरीला परवानगी असणार आहे. तसंच कृषी विषयक दुकाने आठवड्याच्या सातही दिवस खुली राहणार आहेत.ही आहेत कारणं..ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. सध्याच्या घडीला महापालिका हद्दीत प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही १५९५ एवढी आहे. तर रुग्णवाढीचा वेग हा ७.८५ टक्के एवढा आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६९२ दिवसांवर गेला आहे. याशिवाय ५४४८ बेड पैकी सध्या ८६५ बेड भरलेलेले असून उर्वरीत ४ हजार ५८३ बेड हे रिक्त आहेत. याचाच अर्थ सध्याच्या घडीला ८४ टक्के बेड रिकामे आहेत. त्यातही ऑक्सिजनचे एकूण २९१० बेड पैकी ४३१ बेड भरलेलेले असून २ हजार ४७९ बेड रिकामे असून ८५ टक्के ऑक्सीजनचे बेड रिकामे आहेत. तर आयसीयूचे १०९२ बेड असून त्यातील २५४ बेड भरलेलेले असून ८३८ बेड रिकामे आहेत. म्हणजेच ७७ टक्के बेड शिल्लक आहेत. याशिवाय व्हेन्टिलेटरचे ३४२ बेड पैकी ७८ बेड भरलेलेले असून २६४ म्हणजेच ७७ टक्के बेड रिकामे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेtmcठाणे महापालिका