CoronaVirus: Another patient with coronary artery disease | CoronaVirus : डोंबिवलीत कोरोनाचा दुसरा रुग्ण

CoronaVirus : डोंबिवलीत कोरोनाचा दुसरा रुग्ण

डोंबिवली : शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याची घटना ताजी असतानाच आणखीन एका २६ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तुर्कस्तानवरून आलेला हा तरुण होम क्वारंटाइन होता. त्याने जवळच्या नातेवाइकाच्या लग्नालाही उपस्थिती लावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६ झाली आहे.
हा तरुण १५ मार्चला तुर्कस्तानवरून आला. परंतु, तो क्वारंटाइन न होता नातेवाइकाच्या हळदी व लग्नसोहळ्यात सहभागी झाल्याची माहिती नगरसेवकाला मिळाली. नगरसेवकाने त्यावरून तरुणाच्या वडिलांशी चर्चा केली असता त्या तरुणाला सर्दी, ताप, घसादुखीचा त्रास होत असल्याची माहिती मिळाली. नगरसेवकाने याची माहिती केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला दिली. तरुणामध्ये त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्याला पुढील तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले.

Web Title: CoronaVirus: Another patient with coronary artery disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.