शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

coronavirus: भिवंडीत एका आठवड्यात मास्क न घालणाऱ्या २७२ जणांवर कारवाई; १ लाख ३६ हजार रुपयांची दंड वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 7:28 PM

coronavirus: भिवंडीत कोरोनाचा धोका तूर्तास कमी असला तरी प्रशासनाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे .

- नितिन पंडीत 

भिवंडी  - भिवंडीत कोरोनाचा धोका तूर्तास कमी असला तरी प्रशासनाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे . भिवंडी शार परिसरात २३ फेब्रुवारी ते ३ मार्च या एका आठवड्याच्या कालावधीत विना मास्क फिरणाऱ्या तब्बल २७२ जणांवर मनपा व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून सुमारे १ लाख ३६ हजार रुपयांची दंड वसुली केली असल्याची माहिती भिवंडी मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे . तर बुधवारी एकाच दिवसात मास्क न वापरणाऱ्या वीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १० हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे . (Action taken against 272 people in Bhiwandi for not wearing mask in a week; 1 lakh 36 thousand fine recovered)

 भिवंडी मनपाच्या प्रभाग समिती एक मध्ये भोईवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका आठवड्यात मास्क न वापरणाऱ्या ६४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३२ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली असून प्रभाग समिती दोन मध्ये भिवंडी शहर पोलिसांनी ३७ जणांवर कारवाई करून १८ हजार ५०० रुपये दंड वसुली केली आहे . प्रभाग समिती तीन मध्ये निजामपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत ७१ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ३५ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे .प्रभाग समिती चार मध्ये शांतीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत ५२ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २६ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली असून प्रभाग समिती क्रमांक पाच मध्ये नारपोली पोलीस ठाण्याअंतर्गत ४८ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २४ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे . अशा प्रकारे एका आठवड्यात महापालिका व पोलीस प्रशासनाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करून मास्क न वापरणाऱ्या २७२ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ३६ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली असल्याची माहिती मनपाचे जन संपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी दिली आहे .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या