शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

CoronaVirus : ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणखी ९ जणांची रवानगी कस्तुरबात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 2:51 AM

Coronavirus : कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४० जणांना पाठविले असून त्यातील ३० जणांना सोडले असून उर्वरित १० जणांवर उपचार सुरू आहेत.

ठाणे : कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण ठाण्यात वाढला असून त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर ९ जणांनाही कस्तुरबात पाठविण्यात आले आहे. परंतु, त्यांचे अद्यापही रिपोर्ट आले नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.त्याने ज्या खाजगी लॅबमधून टेस्ट केली होती. ती नौपाड्यातील लॅबही सील केल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर आतापर्यंत १६७६ जणांची तपासणी केली आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४० जणांना पाठविले असून त्यातील ३० जणांना सोडले असून उर्वरित १० जणांवर उपचार सुरू आहेत. तर गुरुवारी संध्याकाळी लुईसवाडी परिसरात आणखी एक रुग्ण आढळल्याने ठाण्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीनवर गेली आहे.ठाण्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आता ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, त्याने ही माहिती लपवली होती. त्याच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरूअसल्याची माहिती महापालिकेने दिली. तर त्या व्यक्तीने खासगी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी खासगी पॅथलॅबमधून तपासणी केली होती. त्यानंतर तो स्वत: रुग्णालयात जाऊन दाखल झाला आहे. आता त्या लॅबची माहिती महापालिकेला मिळाली असून ती सील केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु, या नागरिकाला याची लागण कशी झाली, याची माहिती तो देत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पोलीस बळाचा वापर करण्याचा विचार पालिकेने केला आहे. तूर्तास त्याच्या घरातील ९ जणांना कस्तुरबा रुग्णालयात पाठविले असून त्यांचे रिपोर्टअद्याप आलेले नाहीत. परंतु, सदर व्यक्ती अन्य कोणाच्या संपर्कात आली आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.दरम्यान, महापालिकेने २६ मार्चपर्यंत १६७६ जणांची तपासणी केली आहे. यामध्ये ८७८ नागरिक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ७९८ जणांचा यात समावेश आहे. तर आतापर्यंत १६३३ जणांना घरीच देखरेखाली ठेवले आहे. तर ४० जणांना कस्तुरबात पाठविले होते. त्यातील ३० जणांना तपासणी करून घरी सोडले आहे. तर उर्वरित १० जणांवर उपचार सुरूआहेत. त्यातील एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह होता. तर अन्य ९ जण हे संशयित आहेत.आता आणखी एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असून तो खासगी रुग्णालयात उपाचार घेत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तर महापालिकेच्या विलगीकरण कक्षात १० संशयितांना देखरेखीखाली ठेवले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस