CoronaVirus : ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणखी ९ जणांची रवानगी कस्तुरबात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:51 AM2020-03-27T02:51:17+5:302020-03-27T05:38:14+5:30

Coronavirus : कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४० जणांना पाठविले असून त्यातील ३० जणांना सोडले असून उर्वरित १० जणांवर उपचार सुरू आहेत.

CoronaVirus: 9 more people in 'positive' contact, sent to kasturaba hospital | CoronaVirus : ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणखी ९ जणांची रवानगी कस्तुरबात

CoronaVirus : ‘त्या’ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणखी ९ जणांची रवानगी कस्तुरबात

Next

ठाणे : कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण ठाण्यात वाढला असून त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर ९ जणांनाही कस्तुरबात पाठविण्यात आले आहे. परंतु, त्यांचे अद्यापही रिपोर्ट आले नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
त्याने ज्या खाजगी लॅबमधून टेस्ट केली होती. ती नौपाड्यातील लॅबही सील केल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तर आतापर्यंत १६७६ जणांची तपासणी केली आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४० जणांना पाठविले असून त्यातील ३० जणांना सोडले असून उर्वरित १० जणांवर उपचार सुरू आहेत. तर गुरुवारी संध्याकाळी लुईसवाडी परिसरात आणखी एक रुग्ण आढळल्याने ठाण्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीनवर गेली आहे.
ठाण्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आता ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, त्याने ही माहिती लपवली होती. त्याच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरूअसल्याची माहिती महापालिकेने दिली. तर त्या व्यक्तीने खासगी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी खासगी पॅथलॅबमधून तपासणी केली होती. त्यानंतर तो स्वत: रुग्णालयात जाऊन दाखल झाला आहे. आता त्या लॅबची माहिती महापालिकेला मिळाली असून ती सील केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु, या नागरिकाला याची लागण कशी झाली, याची माहिती तो देत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता पोलीस बळाचा वापर करण्याचा विचार पालिकेने केला आहे. तूर्तास त्याच्या घरातील ९ जणांना कस्तुरबा रुग्णालयात पाठविले असून त्यांचे रिपोर्ट
अद्याप आलेले नाहीत. परंतु, सदर व्यक्ती अन्य कोणाच्या संपर्कात आली आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
दरम्यान, महापालिकेने २६ मार्चपर्यंत १६७६ जणांची तपासणी केली आहे. यामध्ये ८७८ नागरिक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ७९८ जणांचा यात समावेश आहे. तर आतापर्यंत १६३३ जणांना घरीच देखरेखाली ठेवले आहे. तर ४० जणांना कस्तुरबात पाठविले होते. त्यातील ३० जणांना तपासणी करून घरी सोडले आहे. तर उर्वरित १० जणांवर उपचार सुरूआहेत. त्यातील एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह होता. तर अन्य ९ जण हे संशयित आहेत.
आता आणखी एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असून तो खासगी रुग्णालयात उपाचार घेत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तर महापालिकेच्या विलगीकरण कक्षात १० संशयितांना देखरेखीखाली ठेवले आहे.

Web Title: CoronaVirus: 9 more people in 'positive' contact, sent to kasturaba hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.