Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६३४ रुग्ण सापडले; दहा जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 08:18 PM2020-11-23T20:18:05+5:302020-11-23T20:18:14+5:30

ठाणे परिसरात १५३ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात ५० हजार ७० रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. तर, तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एक हजार २१७ मृतांची संख्या झाली आहे.

Coronavirus: 634 corona patients found in Thane district; Ten people died | Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६३४ रुग्ण सापडले; दहा जणांचा मृत्यू 

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६३४ रुग्ण सापडले; दहा जणांचा मृत्यू 

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ६३४ रुग्ण नव्याने सापडले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख २४ हजार १६१ रुग्ण झाले आहेत. तर, दहा रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ६०९ झाली आहे. 

ठाणे परिसरात १५३ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात ५० हजार ७० रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. तर, तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एक हजार २१७ मृतांची संख्या झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत ११० रुग्णांची वाढ असून दोन मृत्यू झाले आहेत. आता येथे ५२ हजार ७९५ रुग्ण बाधीत झाले असून एक हजार ४४ मृतांची नोंद आहे. उल्हासनगरात २३ नवे रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात दहा हजार ६५२ बाधीत झाले असून ३५२ मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे. भिवंडी शहरात सहा बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात बाधीत सहा हजार १९० झाले असून मृतांची संख्या ३४० आहे. 

मीरा भाईंदरमध्ये ६३ रुग्णं सापडले असून एकही मृत्यूची नोंद नाही. आता बाधितांची संख्या २३ हजार ७६२ झाली असून मृतांची संख्या ७५२ आहेत. अंबरनाथमध्ये १५ रुग्ण वाढले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या सात हजार ७४६ झाली असून एकूण मृत्यू २८५ झाले आहे. बदलापूरमध्ये १६ रुग्णं सापडल्यामुळे आता बाधीत सात हजार ८३४ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू न झाल्याने मृतांची ९८ कायम आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीणमध्ये ७४ रुग्णांची वाढ असून एक मृत्यू आहे. आता बाधीत १७ हजार ८६३ असून आतापर्यंत मृतांची संख्या ५६० आहे.

Web Title: Coronavirus: 634 corona patients found in Thane district; Ten people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.