शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे 53 कंत्राटी सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 18:32 IST

मीरा भाईंदर महापालिकेने सफाई व आरोग्य विभागातील कायम आणि कंत्राटी अश्या सुमारे 1500 कर्मचाऱ्यांची एंटीजन तपासणी केली असता त्यात 53 कंत्राटी सफाई कामगार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने सफाई व आरोग्य विभागातील कायम आणि कंत्राटी अश्या सुमारे 1500 कर्मचाऱ्यांची एंटीजन तपासणी केली असता त्यात 53 कंत्राटी सफाई कामगार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .मीरा भाईंदर शहरातील दैनंदिन साफसफाई चे काम कंत्राटी सफाई कामगारां मार्फत केले जाते . त्यामुळे सदर कंत्राटी कामगारां सह मुकादम आदी सफाई कामातील कर्मचाऱ्यांना व वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना लागण चा धोका जास्त असल्याने त्यांची कोरोना चाचणी करून घेण्याची मागणी श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी पालिकेस सतत केली होती .कोरोना मुळे कंत्राटी सफाई कामगार व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या मृत्यूचा प्रकार घडला होता . उशिराने का होईना अखेर पालिकेने आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कामगार , मुकादम , स्वच्छता निरीक्षक आदी सुमारे दिड हजार कंत्राटी व कायम कारंचार्यांची गेले दोन दिवस एंटीजन टेस्ट चालवली होती . या तपासणीत 53 सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे .कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने 53 कर्मचाऱ्यांना उपचारासाठी पालिकेच्या कोविड केअर रुग्णालयात दाखल केले आहे . त्यांच्या उपचाराच्या काळातील पगार पालिका कापणार नसल्याचे उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांनी सांगितले

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक