Coronavirus: ठाणे जिल्ह्यात ४८९ नवे रुग्ण; तर ९ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 21:51 IST2021-07-14T21:34:57+5:302021-07-14T21:51:05+5:30
Coronavirus: ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४८९ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ३८ हजार ९६० रुग्णांची नोंद झाली.

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात ४८९ नवे रुग्ण; तर ९ रुग्णांचा मृत्यू
ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४८९ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ३८ हजार ९६० रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ८७३ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ७८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३४ हजार ६०७ झाली आहे. शहरात ३ मृत्यूंची नोंद आहे. तर कल्याण - डोंबिवलीत १४१ रुग्णांची वाढ झाली असून १ मृत्यूची नोंद आहे. नवी मुंबईत ११४ रुग्णांची वाढ झाली असून २ मृत्यूची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये १४ रुग्ण सापडले असून ३ मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत ४ बाधीत असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये ५२ रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद नाही. अंबरनाथमध्ये २२ रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये २६ रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ३८ नवे रुग्ण वाढले असून मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत रुग्णसंख्या ४० हजार ००७ झाली असून मृत्यूची नोंद नाही. आतापर्यंत ११९५ मृत्यूंची नोंद आहे.