शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२९ रुग्ण वाढीसह आठ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 20:36 IST

Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२९ने वाढली असून आठ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३७ हजार ३५८ रुग्णांची व दहा हजार ८३६ मृतांची नोंद झाली आहे.

ठाणे - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२९ने वाढली असून आठ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३७ हजार ३५८ रुग्णांची व दहा हजार ८३६ मृतांची नोंद झाली आहे.

या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील ९६ रुग्ण आहे. आज दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासह बाधितांची संख्या एक लाख ३४ हजार ३३५ झाली आहे. तर मृतांची संख्या दोन हजार ३६ नोंदली. कल्याण डोंबिवलीत ११४ बाधीत व दोन मृत्यू आढळले आहे. या शहरात एक लाख ३७ हजार‌ ४४७ बाधितांसह दोन हजार ६२८ मृतांची नोंद झाली.

उल्हासनगरमध्ये ४ बाधीत सापडले असून मृत्यू नाही. यासह शहरात २० हजार ८७१ बाधितांना ५२२ मृतांची नोंद केली आहे. भिवंडीत तीन बाधीत व एकही मृत्यू नाही. यामुळे या शहरातील दहा हजार ६५४ बाधितांसह ४६० मृत्यू नोंद आहेत. मीरा भाईंदरला ३८ बाधीत असून एकही मृत्यू नाही. या शहरातील ५१ हजार ३७ बांधिता व एक हजार ३४२ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अंबरनाथमध्ये १४ बाधीत व एकही मृत्यू नाही. यामुळे आता येथील बाधितांची संख्या १९ हजार ८९३ व मृतांची संख्या ५१८ नोंदली आहे. कुळगांव बदलापूर शहरात १६ बाधीत सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधीत २१ हजार ३१० तर मृत्यू ३४९ नोंदली आहे. जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये ४४ बाधीत सापडले. पण एक मृत्यू आहे. यामुळे या ग्रमीण क्षेत्रात आजपर्यंत ३९ हजार ८५४ बाधितांची व एक हजार १९५ मृतांची नोंद झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे