CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात आज १ हजार ६६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 11:11 PM2020-07-19T23:11:30+5:302020-07-19T23:12:34+5:30

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६७ हजारांवर; ८९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

CoronaVirus 1663 corona patients registered in Thane district today 19 dead | CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात आज १ हजार ६६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १९ जणांचा मृत्यू

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात आज १ हजार ६६३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १९ जणांचा मृत्यू

Next

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ६६३ नवीन रुग्ण बाधित झाले असून, १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६७ हजार ६०५ तर मृतांची संख्या एक हजार ८९२ इतकी झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रमध्ये रविवारी सर्वाधिक ४२७ रुग्ण नव्याने दाखल झाले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ९०७ तर मृतांची संख्या २४६ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रमध्ये २५७ बाधितांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची १५ हजार ७७३ तर मृतांची संख्या ५७० च्या घरात गेली. नवी मुंबई महापालिकेच्या परिसरातही २८८ नवीन रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. बाधितांची ११ हजार ४२६, तर मृतांची संख्या ३४३ वर पोहोचली. मीरा-भाईंदरमध्ये १३६ रुग्ण नव्याने दाखल झाले असून एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ५५८ तर मृतांची संख्या २२० इतकी झाली. भिवंडी-निजामपूर महापालिका क्षेत्रात ३५ जण बाधित झाले. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ९८ वर पोहोचली. उल्हासनगरमध्ये ९४ रुग्णांची आणि तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.
याठिकाणी बाधितांची संख्या पाच हजार ६२६ तर मृतांची संख्या ८३ वर पोहोचली आहे. अंबरनाथमध्ये ७८ रुग्ण दाखल झाले असून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार १०८ तर मृतांची संख्या ११६ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ७९ रुग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे याठिकाणी आतार्पयच्या बाधितांची संख्या एक हजार ९१३ इतकी झाली. ठाणो ग्रामीण भागांत १६९ रुग्णांची, तर एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार १९६, तर मृतांची संख्या १०८ वर पोहोचली आहे.

Web Title: CoronaVirus 1663 corona patients registered in Thane district today 19 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.