शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ठाण्यात कोरोनाचा हाहाकार; एक हजार 484 बधीतांसह 44 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:09 PM

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 462 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे :  कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या एक हजार 484  तर, 44 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 33 हजार 324 तर, मृतांची संख्या 1 हजार 46 झाली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक 462 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 6  हजार 575 तर, मृतांची संख्या 120 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 266  बाधितांची तर, 15 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 8 हजार 772 तर, मृतांची संख्या 326 वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत 178 रुग्णांची तर, चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 6 हजार 605 तर, मृतांची संख्या 211 वर पोहोचला आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात 82 बधीतांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या एक हजार 941 तर, मृतांची संख्या 109 वर पोहोचली. त्यात मीरा भाईंदरमध्ये 161 रुग्णांसह 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 326 तर, मृतांची संख्या 145 इतकी झाली आहे.

उल्हासनगर 148 रुग्णांची तर, तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एका हजार 914 तर, मृतांची संख्या 46 झाली आहे. अंबरनाथमध्ये 54 रुग्णांची तर, तीघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 823 तर, मृतांची संख्या 45 झाली आहे. बदलापूरमध्ये 32 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 774 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात 101 रुग्णांची तर, दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या एक हजार 594 तर, मृतांची संख्या 47 वर गेली आहे. या वाढत्या बाधितांच्या संख्येसह वाढत्या मृतांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागावरील ताण वाढत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे