CoronaVirus In Thane: ठाणे जिल्ह्यात ४९३४ कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ; १९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 08:47 PM2021-04-03T20:47:08+5:302021-04-03T20:47:31+5:30

CoronaVirus In Thane: ठाणे शहरात एक हजार ४२७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ८२ हजार १२५ झाली आहे.

Corona Virus In Thane: An alarming increase of 4934 Corona patients in Thane district; 19 killed | CoronaVirus In Thane: ठाणे जिल्ह्यात ४९३४ कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ; १९ जणांचा मृत्यू

CoronaVirus In Thane: ठाणे जिल्ह्यात ४९३४ कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ; १९ जणांचा मृत्यू

Next

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे चार हजार  ९३४ रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याशिवाय शनिवारी १९ जणांचा मृत्यू झाल्याने या चिंतेत आणखी भर पडली. जिल्ह्यात आता तीन लाख ३२ हजार ६६६ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार ५४४ नोंदली आहे.  

ठाणे शहरात एक हजार ४२७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ८२ हजार १२५ झाली आहे. शहरात आज ५ मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४६१ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत एक हजार २४१ रुग्णांची वाढ झाली असून चार मृत्यू आहे. आता ८२ हजार ४२३ रुग्ण बाधीत असून एक हजार २६६ मृत्यूची नोंंद झाली आहे. 

उल्हासनगरमध्ये १६३ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या १४ हजार ४१३ झाली. तर, ३८० मृत्यू झाले आहे. भिवंडीला १४१ बाधीत आढळून आले असून मृत्यू नाही. आता बाधीत सात हजार ९८९ असून मृतांची संख्या ३६३ नोंदली आहे. मीरा भाईंदरमध्ये ३४९  रुग्ण आढळले असून चार मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या ३१ हजार ६५५असून मृतांची संख्या ८३३ आहे.

अंबरनाथमध्ये ११८ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत ११  हजार ३१३ असून मृत्यू ३२० आहेत. बदलापूरमध्ये २०६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १२ हजार ८८२झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १२५ आहे. ग्रामीणमध्ये ८१ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता बाधीत २१ हजार २०४ आणि आतापर्यंत ६१० मृत्यू झाले आहेत.

Web Title: Corona Virus In Thane: An alarming increase of 4934 Corona patients in Thane district; 19 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.