Corona virus News: ठाण्यात सकाळी ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 09:45 PM2021-04-21T21:45:41+5:302021-04-21T21:52:09+5:30

सकाळी ७ ते ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी किराणा माल आणि भाजी विक्रेते यांच्यासह ते खरेदीसाठी जाणाºया नागरिकांचीही तारेवरची कसरत होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यामध्ये आणखी किमान दोन तासांची वाढ करुन ती दुपारी १ वाजेपर्यंत करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Corona virus News: Traders and citizens work hard to meet '11 am' deadline in Thane | Corona virus News: ठाण्यात सकाळी ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांचीही तारेवरची कसरत

नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Next
ठळक मुद्दे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा ११ ऐवजी दुपारी १ पर्यंत वेळ वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या थोपविण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजताची ‘डेडलाईन’ पाळण्यासाठी किराणा माल आणि भाजी विक्रेते यांच्यासह ते खरेदीसाठी जाणाºया नागरिकांचीही तारेवरची कसरत होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यामध्ये आणखी किमान दोन तासांची वाढ करुन ती दुपारी १ वाजेपर्यंत करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्याचबरोबर मृत्युचीही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने गेल्या काही दिवसांपासून अधिक कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त किराणा आणि भाजी विक्रेत्यांना सकाळी ११ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या वेळेचे काटेकोर पालन करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत पोलिसांची वाहने ध्वनीक्षेपकावरुन दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असतात. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून किंवा कारवाईच्या भीतीने ११ पर्यंत ही सर्व दुकाने बंद होतात. परंतू, मासळी तसेच अनेक विक्रेत्यांना सकाळी ९ ते १० पर्यंत माल मुंबईतून आणल्यानंतर विक्रीसाठी अवघा एक ते दोन तासांचा अवधी मिळतो. त्यामुळे या विक्रेत्यांची दमछाक होते. त्याचवेळी ग्राहकांनाही सकाळी ११ नंतर किराणा किंवा भाजी मिळत नसल्यामुळे त्यांनाही गैरसोयीला सामोरे जाावे लागते. त्यामुळे ही वेळ आणखी एक ते दोन तासांनी वाढवून द्यावी, अशी मागणी विक्रेते तसेच ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
* दरम्यान, नियम न पाळणाºया विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पालिका आणि पोलिसांकडून उगारला जात आहे. त्यातच त्यांना सक्तीने कोरोना चाचणीही आवश्यक केल्यामुळे ती करण्यासाठी या व्यापाºयांची मोठी कसरत होत आहे. त्यासाठीही आणखी मुदतवाढ मिळावी, असाही सूर जांभळी नाका आणि वागळे इस्टेट येथील व्यापाºयांनी व्यक्त केला आहे.

सकाळी मासळी किंवा इतर माल खरेदीसाठी पहाटे मुंबईत जावे लागते. ते घेऊन येईपर्यंत सकाळी ९ ते ९.३० होतात. मग विक्रीसाठी मिळणारा अवधी अगदी अल्प आहे. यात वाढ करण्यात यावी.
सीमा कोळी, मासळी विक्रेती, ठाणे.

मी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत आहे. रात्री उशिरा रुग्णालयातून आल्यानंतर सकाळी घरातील कामे उरकून पुन्हा रुग्णालयात जाण्याची धावपळ असते. त्यात सकाळी ११ पर्यंतच किराणा आणि भाजी विक्री सुरु असल्यामुळे ती खरेदीसाठी मोठी कसरत होते.
एक परिचारिका, ठाणे.

Web Title: Corona virus News: Traders and citizens work hard to meet '11 am' deadline in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.