शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Corona Vaccine : ठाणे जिल्ह्याला मिळाल्या  85 हजार कोरोना लसी, आणखी ८१ हजार मिळणार; ठाणे, नवी मुंबईला सर्वाधिक लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:06 AM

Corona Vaccine : गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला होता, तर लसींचा साठा अपुरा असल्याने वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते.

ठाणे  : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा साठा अपुरा पडू लागला होता. ठाण्यात तर वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानंतर आता जिल्ह्याला ८५ हजार लसींचा साठा मिळाला आहे. त्यामुळे  लसीकरण उत्सव दोन दिवसच चालण्याची शक्यता आहे. सोमवारी किंवा मंगळवारी आणखी ८१ हजार लसींचा साठा मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.  गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला होता, तर लसींचा साठा अपुरा असल्याने वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार लसींचा उत्सव कसा साजरा करायचा असा पेच यंत्रणांपुढे होता. परंतु, आता जिल्ह्यासाठी सोमवारी ८५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्याचे वाटपही झाले आहे. या सर्व लसी कोविशिल्डच्या असल्याचे सांगण्यात आले. परंतु, उपलब्ध साठा वितरित केल्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या वाटेला दीड हजार ते २० हजारपर्यंत साठा मिळाला आहे. त्यामुळे तो किती दिवस पुरणार, असा प्रश्न महापालिकांना पडला आहे. पुढील दोन दिवस पुरेल एवढा हा साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु त्यानंतर काय करायचे असा पेच आहेच. त्यामुळे लसीकरणाचा उत्सव कसा साजरा करायचा, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दुसरीकडे सोमवारी सांयकाळी किंवा मंगळवार सकाळपर्यंत आणखी ८१ हजार लसींचा साठा उपलब्ध होणार आहे.

लसींचा पालिकानिहाय साठामहापालिका      मिळालेला लसींचा साठाठाणे    १५,०००नवीमुंबई    २०,०००कल्याण डोंबिवली    १२,०००उल्हासनगर    १५००भिवंडी    १५००मीरा-भाईंदर    १५,०००ठाणे ग्रामीण    २०,०००एकूण    ८५०००

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस