Corona in Thane district is declining; Only 735 new patients and 12 deaths | ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचे सावट कमी होतय; नवे रुग्ण अवघे ७३५ तर मृत्यू फक्त बारा    

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचे सावट कमी होतय; नवे रुग्ण अवघे ७३५ तर मृत्यू फक्त बारा    

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसह मृतांच्या संख्येत कमालीची घट गेल्या पाच दिवसांपासून होत आहे. रविवारी जिल्ह्यात फक्त ७३५ नव्या रुग्णांची वाढ झाली तर अवघे १२ जण दगावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख सात हजार ४१ झाली आहे. मृतांची संख्या पाच हजार २२६ झाली, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

      जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील १७० रुग्ण नव्याने वाढले  आहेत. या शहरात आता ४५ हजार ४११ एकूण रुग्ण संख्या झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १३० झाली. कल्याण - डोंबिवली शहरात १६७ रुग्णांची आज वाढ झाली असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत ४९ हजार १८२ रुग्ण बाधीत असून ९९३ मृत्यू आजपर्यंत झाले आहे.

                         उल्हासनगरला ३० नवे रुग्ण आढळले असून, एका जणाचा मृत्यू झाला आहे. या शहरातील बाधितांची संख्या दहा हजार ९९ झाली असून ३३३ मृत्यू नोंदवण्यात आलेले आहेत. भिवंडीला २३ बाधीत आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ८२६ असून मृतांची संख्या ३३०  आहे. मीरा भाईंदरमध्ये ९९ रुग्णांच्या वाढीसह चार मृत्यू झाले आहेत. या शहरात आता बाधितांची संख्या २२ हजार ४९ झाली असून मृतांची संख्या ६९८ आहे.

          अंबरनाथला १० रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत सात हजार १७२ झाले असून मृतांची संख्या २७२ आहे. बदलापूरमध्ये ३० रुग्ण सापडल्यामुळे आता बाधीत सात हजार १९३ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या ९६ कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांंत २५ रुग्ण नव्याने वाढले असून  एकही  मृत्यू झाला नाही. ग्रामीण भागात आता १६ हजार ४८३ बाधीत झाले असून ५०८ मृत्यू झाले आहेत.

Web Title: Corona in Thane district is declining; Only 735 new patients and 12 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.