CoronaVirus News : आयुक्तालयातील १३ पोलिसांना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:50 IST2020-06-21T00:50:07+5:302020-06-21T00:50:25+5:30
आतापर्र्यंत ३३० पैकी २५१ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

CoronaVirus News : आयुक्तालयातील १३ पोलिसांना कोरोना
ठाणे : पोलीस आयुक्तालयात दोन उपनिरीक्षकांसह १३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्र्यंत ३३० पैकी २५१ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
कोरोनामुळे उल्हासनगरचे एक व श्रीनगर पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू ओढवला आहे. पोलिसांचे बरे होण्याचे प्रमाण ७६ टक्के आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याने बंदोबस्ताचा ताण कमी झाला असला तरी पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होणे सुरूच आहे. शुक्रवारी विविध पोलीस ठाण्यांतील १३ पोलिसांसह मानपाडा व नारपोली पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी कोरोनाबाधित आढळले आहेत. आयुक्तालयात आतापर्यंत ३१ अधिकारी व २९९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील २६ पोलीस अधिकारी आणि २२५ पोलीस कर्मचारी कोरोनातून बरे झाले आहेत. यात ठाणे पोलीस मुख्यालयातील लागण झालेल्या ६७ पैकी ५६ जणांचा समावेश आहे.