Coorona in Thane: 12 in Thane, 10 patient in Kalyan; Today found 4 hrb | ठाण्यात 12, तर कल्याणमध्ये १० कोरोनाग्रस्त; आज चौघांची भर

ठाण्यात 12, तर कल्याणमध्ये १० कोरोनाग्रस्त; आज चौघांची भर

ठाणे  : कोरोना व्हायरसचे आणखी दोन रुग्ण ठाण्यात आढळले आहेत. हे दोन रुग्ण वर्तकनगर भागात आढळले असून पती पत्नीलाही लागण झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 झाली आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांना शक्यतो घरातच रहा, असे आवाहन केले आहे.


 ठाण्यात मागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यानंतर तब्बल दोन आठवडय़ांनी रुग्णांच्या संख्येत दिवसाला वाढ होतांना दिसत आहे. कळव्यातील 5 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याच भागातील आणखी दोघांना याची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पती पत्नीचा समावेश आहे. हे दोघे 18 मार्च रोजी युके वरुन आले होते. त्यानंतर 21 मार्च रोजी त्यांना त्रस होऊ लागला होता. त्यानंतर 23 मार्च रोजी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता वर्तकनगर भागातील अन्य एका दामप्त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दामप्त्य 15 मार्च रोजी युएस वरुन आले होते. 21 मार्च रोजी त्यांना त्रास होऊ लागल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर आता त्यांचाही रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे आता शहरातील रुग्णांची संख्या 12 झाली असल्याची माहिती पालिकेने दिली. कोरोना आता तिस:या स्टेजला आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर पडू नये आवाहन पालिकेने केले आहे.


कल्‍याण डोंबिवली को बधितांची संख्या 10

कल्‍याण - कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १० कोरोना बाधीत रूग्‍ण आढळून आले असून त्‍यापैकी ०३ रूग्‍णांना डिस्चार्ज देण्‍यात आलेला आहे. आज  २ नविन रूग्‍ण आढळून आले असून या रूग्‍णांपैकी कोपर रोड, डोंबिवली पश्‍चिम व मढवी येथील प्रत्‍येकी ०१ रूग्‍ण आहेत. उर्वरीत सर्व रूग्‍णांची प्रकृती स्थिर असून ते त्‍यापैकी ०१ रूग्‍ण जसलोक रूग्‍णालय, मुंबई येथे तर इतर सर्व रूग्‍ण कस्‍तुरबा रूग्‍णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.

दोन नवीन रूग्‍णांपैकी कोपर येथील रूग्‍णाच्‍या ०२ निकटसहवासितांना कस्‍तुरबा येथे संदर्भित करण्‍यात आले होते. त्‍यांचे अहवाल अद्याप अप्राप्‍त आहेत. पॉझिटीव्‍ह आढळून आलेल्‍या रूग्‍णांच्‍या परिसरात शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कंटेंटन्‍मेंट प्‍लॅन तयार करण्‍यात येवून कार्यवाही करण्‍यात येत आहे. सध्‍या महापालिका क्षेत्रात२७५ होम क्‍वारंटाईन नागरीक असून महापालिकेमार्फत त्‍यांची दैनंदिन विचारपूस करण्‍यात येत आहे.

Web Title: Coorona in Thane: 12 in Thane, 10 patient in Kalyan; Today found 4 hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.