Construction labour arrested for sexually assaulting a minor girl in Thane | ठाण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बिगारी कामगाराला अटक

चितळसर पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देमुलीच्याच मैत्रिणीशी केले अश्लील चाळेपोक्सो अंतर्गत झाला होता गुन्हा दाखल चितळसर पोलिसांची कारवाई

ठाणे : पवारनगर येथील एका सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या अनिल सुभाष भोस्तेकर (३०, रा. नवीन म्हाडा वसाहत, ठाणे) याला चितळसर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
बिगारी काम करणा-या अनिलच्या एका दहा वर्षीय मुलीसोबत पिडीत मुलगी त्यांच्या घरी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी आली होती. त्यावेळी त्याने त्याच्या दोन्ही मुलांना पैसे देउन खाउ आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवून दिले. त्यावेळी ही मुलगी त्याच्या घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेत त्याने तिचा विनयभंग करीत तिच्याशी लैंगिक चाळे केले. हा प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर याप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी चितळसर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण तसेच विनयभंग या कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. आर. साळवी यांच्या पथकाने त्याला १७ सप्टेंबर रोजी अटक केली.

Web Title: Construction labour arrested for sexually assaulting a minor girl in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.