उल्हासनगरात संविधान रॅली, काँग्रेसचा पाठिंबा, प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन आणि निवेदन
By सदानंद नाईक | Updated: December 21, 2024 22:20 IST2024-12-21T22:15:48+5:302024-12-21T22:20:20+5:30
Ulhasnagar News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनेने संविधान रॅली काढण्यात आली. रॅलीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन रॅलीत सहभागी होऊन, प्रांत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करीत प्रांत अधिकाऱ्यास निवेदन दिले.

उल्हासनगरात संविधान रॅली, काँग्रेसचा पाठिंबा, प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन आणि निवेदन
- सदानंद नाईक
उल्हासनगर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनेने संविधान रॅली काढण्यात आली. रॅलीला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देऊन रॅलीत सहभागी होऊन, प्रांत कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करीत प्रांत अधिकाऱ्यास निवेदन दिले. तसेच ठाकरे गट व रिपाई आंबेडकर गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत शहाच्या वक्तव्याचा निषेध केला.
उल्हासनगरकाँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाचा भाजपा नेते व केंद्रीयमंत्री शहा यांनी अपमान केल्याचा निषेध करण्यात आला. तसेच विविध सामाजिक संघटनेने काढलेल्या संविधान रॅलीला काँग्रेस पाठिंबा देऊन कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन करून प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांना निवेदन दिले. तसेच परभणी येथील संविधान प्रतची विटंबना प्रकरणी पोलिस कारवाईत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी दोषीवर कारवाईची मागणी केली. शहरांत सर्वपक्षीय व विविध संघटनेच्या वतीने संविधान सन्मान रैलीचेही आयोजन केले होते. त्याला काँग्रेसने पाठिंबा देऊन रॅलीत सहभागी झाले.
सदर आंदोलनात काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह काँग्रेसच्या गटनेत्या व माजी नगरसेविका अंजली साळवे, किशोर धडके, मनीषा महाकाळे, आशाराम टाक, प्रा. सिंधुताई रामटेके, विशाल सोनवणे, मालती गवई , विजय मोरे, अमोल राऊत व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येंनी उपस्तित होते.