आधारवाडी डम्पिंगवर मास्क लावून महिलांचे हळदीकुंकू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 01:28 AM2020-02-03T01:28:05+5:302020-02-03T01:29:07+5:30

कचऱ्याच्या समस्येकडे वेधले लक्ष

The constant fire and smoke from the Aadharwadi dumping ground threatened the health of the residents | आधारवाडी डम्पिंगवर मास्क लावून महिलांचे हळदीकुंकू

आधारवाडी डम्पिंगवर मास्क लावून महिलांचे हळदीकुंकू

googlenewsNext

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला सतत लागणारी आग आणि धूर यामुळे तेथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान मुले, वृद्धांची घुसमट होत आहे. याचा आधारवाडी परिसरातील तीर्थधाम सोसायटीतील जागृत महिला मंडळाने अनोख्या पद्धतीने निषेध केला. हळदीकुंकू समारंभात ‘आपले आरोग्य, आपणच सांभाळा’ असा संदेश देऊ न मास्क लावून या समस्येकडे लक्ष वेधले.

डम्पिंग ग्राउंड परिसरात राहणाºया नागरिकांना रोजच उग्र दर्पाचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सुमारे ६०० टन इतका कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. यात आता २७ गावांचीही भर पडली आहे. या डम्पिंगची व्यवस्था लावा, तोपर्यंत नवीन बांधकामे न करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी दिला होता.

केडीएमसीने दोन वर्षांनी शास्त्रोक्त पद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तसेच, इतर प्रकल्पही उभारले असल्याचे दाखवत बांधकामांवरील बंदी उठवून घेतली. मात्र, प्रकल्प आहे त्याच जागेवर आहेत, तर काही प्रकल्पांना तेथील स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याने प्रकल्प उभे राहू शकले नाही. नेहमीच लागणाºया आगींमुळे तसेच धूर आणि डम्पिंगच्या वासाने स्थानिकांनी मोर्चे, आंदोलने केली. गतवर्षी डम्पिंगचा प्रश्न मार्गी लावा; अन्यथा आयुक्त आणि अधिकाऱ्यांचे पगार रोखण्यात येतील, असेही सांगण्यात आले होते. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. २०२० या वर्षाच्या सुरुवातीलाच डम्पिंग ग्राउंडला आग लागण्याच्या सत्राला सुरुवात झाल्याचे या महिलांनी सांगितले.

केडीएमसीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

आधारवाडी डम्पिंगमुळे केवळ आरोग्याचाच प्रश्न निर्माण झालेला नाही, तर सामाजिक समस्याही निर्माण झाली आहे. डम्पिंगच्या त्रासामुळे एका तरुणाचे लग्नही मोडले होते. आम्हीही कर भरतो; मात्र आमच्या आरोग्याच्या समस्यांकडे केडीएमसी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे महिला मंडळातील महिलांनी सांगितले. शेजारच्या फडके मैदानावर राजकीय सभा, समारंभ असले तरच डम्पिंगच्या कचºयावर सुवासिक फवारणी करण्यात येत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

Web Title: The constant fire and smoke from the Aadharwadi dumping ground threatened the health of the residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.