शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

हवालदाराला फरफटत नेणा-या मोटारचालकास अटक, काचा फोडून काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 11:07 PM

 भरधाव वेगाने जाणा-या मोटारीचा पाठलाग करणारे हवालदार रेवननाथ शेकडे (२८) यांना मोटार चालकाने तब्बल पाच किलोमीटर फरफटत नेल्याची घटना मंगळवारी रात्री नितिन कंपनी येथे घडली.

ठाणे, दि. 13 - भरधाव वेगाने जाणा-या मोटारीचा पाठलाग करणारे हवालदार रेवननाथ शेकडे (२८) यांना मोटार चालकाने तब्बल पाच किलोमीटर फरफटत नेल्याची घटना मंगळवारी रात्री नितिन कंपनी येथे घडली. या घटनेत शेकडे यांच्या हातापायाला गंभीर इजा झाली. नागरिकांच्या मदतीने मोटारचालक नवीन रायबगी (२९) याला अटक करण्यात आली.नाशिक ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक वॅगनार मोटार भरधाव वेगाने जात असल्याची माहिती नौपाडा सीआर (नियंत्रण कक्ष व्हॅन) मोबाईलला मिळाली. ही माहिती मिळताच रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास नितिन कंपनी येथील पोलीस हवालदार शेकडे यांच्या पथकाने तिचा पाठलाग सुरु केला. तिला तीन हात नाक्याजवळील गुरुद्वाराजवळ त्यांनी अडविले. तेंव्हा वॅगनार चालक रायबगी याने शेकडे यांना जोरदार धडक दिली. शेकडे वॅगनारच्या बोनेटवर पडले. गाडीच्या वायपरला त्यांनी पकडून ठेवले. तशाच अवस्थेत रायबगीने वॅगनार कोपरी सर्कलपर्यंत नेली. तेथून सर्व्हीस रोडवरुन तीन हात नाक्याकडे आणून पुन्हा नाशिकच्या दिशेकडे पिटाळली. मोटारीला लटकलेल्या अवस्थेतील पोलीस हवालदार फरफटत जात असल्याचे पाहून काही नागरिकांनी ही गाडी कशीबशी थांबविली. गाडीच्या काचा फोडून चालकाला बाहेर काढण्यात आले. नौपाडा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत आवारे यांच्या पथकाने अखेर चालक नवीनला अटक केली. या गोंधळात त्याच्या शेजारी बसलेली महिला पसार झाली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. 

 

टॅग्स :Crimeगुन्हा