काँग्रेस नेते अन् माजी नगरसेवक सुरेश जाधव यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 23:18 IST2020-07-15T23:17:48+5:302020-07-15T23:18:04+5:30

सन 1985 सालापासून ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते.

Congress leader and former corporator Suresh Jadhav passes away | काँग्रेस नेते अन् माजी नगरसेवक सुरेश जाधव यांचं निधन

काँग्रेस नेते अन् माजी नगरसेवक सुरेश जाधव यांचं निधन

ठाणे : आनंद नगर येथील काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक सुरेश जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, ते 67 वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणीदेखील केली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. 15 वर्षे ते आंनद नगरचे नगरसेवक होते. 

सन 1985 सालापासून ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी सामाजिक उपक्रम राबविले. आनंद नगर परिसरातील रहिवाशांसाठी त्यांनी आनंद नगर को. ऑप. हौ. सोसा. स्थापना केली होती आणि या माध्यमातून आनंद नगरमध्ये सोसायटी व्हावी म्हणून गेली अनेक वर्षे ते झटत होते. शांत, संयमी असा त्यांचा स्वभाव होता, त्यांच्या अचानक जाण्याने रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन  मुले आणि दोन विवाहित मुली आहेत.
 

Web Title: Congress leader and former corporator Suresh Jadhav passes away