उल्हासनगरातील डॉ प्रशांत इंगळे यांच्याकडे काँग्रेसने दिली बिहार विधानसभा निरीक्षकपदाची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:15 IST2025-10-27T17:14:36+5:302025-10-27T17:15:18+5:30
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील काँग्रेस नेते डॉ प्रशांत इंगळे यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास दाखवित बिहार विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी निवड केली. बिहारला महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करून, निवडणुकीत काँग्रेस महत्वपूर्ण भूमिका वठविणार असल्याचे संकेत दिले.

उल्हासनगरातील डॉ प्रशांत इंगळे यांच्याकडे काँग्रेसने दिली बिहार विधानसभा निरीक्षकपदाची जबाबदारी
- सदानंद नाईक
उल्हासनगर - शहरातील काँग्रेस नेते डॉ प्रशांत इंगळे यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास दाखवित बिहार विधानसभा मतदारसंघ निरीक्षक पदी निवड केली. बिहारला महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त करून, निवडणुकीत काँग्रेस महत्वपूर्ण भूमिका वठविणार असल्याचे संकेत दिले.
उल्हासनगरातील काँग्रेस नेते डॉ प्रशांत इंगळे यांच्यावर काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीत सितामढी, पतनाह मतदारसंघाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे, पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मायनॉरीटी सेलचे अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगडी यांनी सोपविली. डॉ इंगळे यांना वडीलाकडून राजकीय बालकडू मिळाले असून मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्या पासून त्यांनी राजकारणाला सुरवात केली. यापूर्वी त्यांनी बीएसपी प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी १२ वर्षे संभाळली. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विविध कमिटीवर काम यशस्वीपणे काम करून वरीष्ठाचा विश्वास निर्माण केला.
बिहार विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात दोन टप्प्यात होणार असून पतनाह मतदार संघाची निवडणूक ही ११ नोव्हेंबर रोजी होत आहे. पक्षाने सोपवलेल्या जबाबदारी इमानेइतबारे निभावणार असून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचे इंगळे म्हणाले. इंगळे यांचे वडील रिपाई आठवले गटात प्रदेश पदाधिकारी होते. गेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक बीएसपी कडून लढवली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत पक्ष निरीक्षक पदी नियुक्त केल्या प्रकरणी इंगळे यांनी पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष मालिका अर्जुन खरगे, पक्षाचे नेते राहुल गांधी, खासदार इम्रान प्रतापगडि ह्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.