उल्हासनगर रस्त्यावरील खड्ड्यावर रॅप सॉंग काढणाऱ्या गायकाचा काँग्रेसकडून सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:34 IST2025-06-30T18:33:49+5:302025-06-30T18:34:20+5:30

रस्ते विकास कामासाठी खोदलेल्या रस्त्याची दुरस्ती न केल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

congress felicitates singer who rapped on ulhasnagar road pothole | उल्हासनगर रस्त्यावरील खड्ड्यावर रॅप सॉंग काढणाऱ्या गायकाचा काँग्रेसकडून सत्कार

उल्हासनगर रस्त्यावरील खड्ड्यावर रॅप सॉंग काढणाऱ्या गायकाचा काँग्रेसकडून सत्कार

उल्हासनगर : शहरातील रस्तावरील खड्ड्यावर रॅप सॉंग सॉंग गाणारा रैप सिंगर कुलदीपसिंग लबाना यांचा काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सत्कार केला. रस्ते विकास कामासाठी खोदलेल्या रस्त्याची दुरस्ती न केल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

 उल्हासनगरात भुयारी गटार, पाणी पुरवठा वितरण योजना, रस्ते योजनासह इतर विकास कामा अंतर्गत रस्ते खोदले आहेत. खोडलेल्या रस्त्याची दुरस्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्तानी संबंधिताना देऊन तश्या नोटीसा काढल्या. त्यानंतरही रस्त्याची दुरस्ती झाली नाही. या रस्त्याची दैनावस्था रॅप सॉंगद्वारे सोशल मीडियावर मांडणाऱ्या कुलदीप सिंग लबाना यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

शहरातील फॉरवर्ड लाईन परिसरातील एका छोट्याश्या घरात म्यूजिक स्टूडियो चालवून रैप गाणे बनवणाऱ्या कुलदेपसिंग लबाना ह्यांची उल्हासनगर कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी रविवारी भेट घेतली. शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे स्वतः पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह लबाना यांच्या स्टुडिओत जाऊन त्याचा सत्कार केला. जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे ह्यांनी कुलदीपचे कौतुक करून सत्कार केल्यावर, महापालिका प्रशासनाने आतातरी, रॅप सॉंगची दखल घेऊन कारवाई अशी मागणी केली. काँग्रेसने देखील दोन महिण्यापूर्वी रस्त्यांच्या दुरवस्थेवर आंदोलन केले होते. याची साळवे यांनी आठवण करून दिली. ह्या गाण्यामुळे नागरिकांचे व्यथा आत्ता तरी प्रशासनाच्या लक्षात येईल हे अपेक्षा आहे. यावेळी नानिक आहुजा ,व्यापारी सेल अध्यक्ष पवन मिराने , भूषण मसाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: congress felicitates singer who rapped on ulhasnagar road pothole