शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

खारेगाव रेल्वे फाटक पूल मेपर्यंत पूर्ण करा , कामांची गती वाढविण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 1:21 AM

मंगळवारी आयुक्तांनी विटावा येथील स्पोर्टस कॉम्प्लेक्सपासून पाहणी दौऱ्यास सुरुवात केली.

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या प्रकल्पामधील खारकर कंपाउंड, कळवा पूल, खारीगांव ब्रिज, पारिसक चौपाटी, साकेत बाळकूम वॉटरफ्रंट, जिम्नॅस्टिक पार्क, ज्युपिटर मल्टीपार्किृग सेंटर, सेंट्रल पार्क, सायन्स सेंटर, अर्बन जंगल आदी प्रकल्प कामांची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी पाहणी करुन सर्वच प्रकल्पांच्या कामाची गती वाढविण्याचे आदेश दिले. यात प्रामुख्याने खारेगांव रेल्वे फाटक पुलाला मे महिन्याची तर कळवा ब्रिजचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.मंगळवारी आयुक्तांनी विटावा येथील स्पोर्टस कॉम्प्लेक्सपासून पाहणी दौऱ्यास सुरुवात केली. या पाहणी दौºया नगरसेवक मुकुंद केणी, नजीब मुल्ला, संजय भोईर, नगरसेविका उषा भोईर अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, नगर अभियंता रवींद्र खडताळे, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, मनीष जोशी,अशोक बुरपल्ले, उपनगर अभियंता प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता रामदास कोल्हे, मनोज तायडे, सहाय्यक आयुक्त चारु शीला पंडित आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.विटावा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सिमेंट वापर कमी कराविटावा येथील स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या कामाची पाहणी करताना हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देतानाच सिमेंटचा वापर कमी करून पर्यावरणपूरक ग्रीन वॉल बनविण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर क्रीडा साहित्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यास सांगितले.कळवा ब्रिज येथे सुरू असलेल्या कामामुळे होत असलेली वाहतूककोंडी लक्षात घेऊन येथील कामाची गती वाढविणे तसेच जूनपर्यत कळवा ब्रिजचे काम पूर्ण होईल, या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.तसेच खारेगांव रेल्वे फाटक येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी करून त्याचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होईल या दृष्टीने काम जलदगतीने पूर्ण करून मोकळ्या जागेत मॉडेल प्रपोजल सादर करण्याबाबतही सूचना संबंधीतांना दिल्या.सायन्स सेंटरला भेटठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र . ४४ येथे बांधलेल्या सायन्स सेंटरलाही त्यांनी भेट दिली. या सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या विविध विज्ञान प्रकल्पाची पाहणी करून या प्रकल्पाअंतर्गत उर्जासंबंधी विविध प्रकल्प,पर्यावरण या विषयावर आधारीत जी विविध उपकरणे मांडण्यात आली आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान शिकणे सहज सोपे होईल, असे सांगून या विज्ञान सेंटरबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.सेंट्रल पार्कचे काम अंतिम टप्प्यात३२ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या अद्ययावत सेंट्रल पार्कमध्ये तलाव, चिल्ड्रन्स प्ले एरिया, कारंजे आणि स्पोर्टस असे चार झोन आहेत. यातील चिल्ड्रन प्ले एरिया या झोनचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरीत झोनची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी हिरानंदानी पातलीपाडा येथील अर्बन जंगलाची आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली.आयुक्तांची धडक कारवाईठाणे महापालिकेच्या वतीने कोलशेत येथे वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाला अडथळा ठरत असलेल्या दोन अनधिकृत खोल्याचे बांधकाम निदर्शनास येताच ते तत्काळ तोडण्याचे आदेश आयुक्तांनी अतिक्रमण विभागास दिले. त्यानंतर दोन जेसीबीच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात अतिक्र मण विभागाने ही कारवाई केली.जिम्नॅस्टिक पार्कच्या कामाचा आढावापारिसक चौपाटी, साकेत बाळकूम वॉटरफ्रंट डेव्हल्पमेंट तसेच इतर सर्व वॉटर फ्रंटच्या कामाची गती वाढविण्याबाबतच्या सूचनाही आयुक्तांनी येथील पाहणी दरम्यान दिल्या. राबोडीतील के.व्हीला येथील नाल्याची साफसफाई करून कलव्हर्ट बसविण्यासाठी शॉर्ट नोटीस टेंडर काढून नाल्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले. ज्युपिटर लेवल पार्किंग या प्रकल्पाला भेट देवून पहिले चार मजले लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सूचित केले. वर्तकनगर प्रभाग समितीमधील जिम्नॅस्टिक पार्कच्या कामाचा आढावादेखील यावेळीआयुक्तांनी घेतला.

टॅग्स :thaneठाणे