शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरांविरोधातच तक्रार

By admin | Updated: March 21, 2017 01:57 IST

भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप असलेल्या मोरेश्वर भोईर यांना भाजपाने उपमहापौरपद दिले आहे. हे कोणत्या न्यायात बसते.

कल्याण : भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप असलेल्या मोरेश्वर भोईर यांना भाजपाने उपमहापौरपद दिले आहे. हे कोणत्या न्यायात बसते. हाच भाजपाचा पारदर्शी कारभार आहे का, असा सवाल भाजपाचे उत्तर भारतीय आघाडीचे माजी कल्याण अध्यक्ष व मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश सिन्हा यांनी केला आहे. भोईर यांची पक्षाने हाकालपट्टी करावी, अशी मागणी सिन्हा यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या मुद्यावरून भाजपात मराठीविरुद्ध उत्तर भारतीय, असे राजकारण रंगले आहे. पिसवली गावात २००८ मध्ये ओमप्रकाश दुबे व मयूर दुबे यांची हत्या करण्यात आली. ते दोघेही भाजपाचे ग्रामीण उपाध्यक्ष जय दुबे यांचे भाऊ होत. पंचायत समितीच्या उमेदवारी मिळवण्याच्या वादातून दुबे बंधूंची हत्या झाली होती. हत्या प्रकरणाचा आरोप भोईर यांच्यावर आहे. २००८ मध्ये भोईर हे मनसेत होते. त्यानंतर, ते भाजपामध्ये आले. भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप असलेल्या भोईर यांना उपमहापौरपद देणे कितपत योग्य आहे. त्यामुळे उत्तर भारतीय समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भोईर यांना पदावरून न हटवल्यास उत्तर भारतीय समाजाला भाजपाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा सिन्हा यांनी दिला आहे. दरम्यान, उपमहापौर भोईर यांनी सांगितले की, दुबे हत्या प्रकरण हे वैयक्तिक होते. ते न्यायप्रविष्ट आहे. या हत्या प्रकरणात माझा भाऊही मारला गेला. ही बाजू लपवून ठेवली जाते. पिसवली ६० टक्के उत्तर भारतीयांची वस्ती आहे. याच गावातून २००९-१० मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माझे पॅनल निवडून आले. त्यानंतर, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्या वेळी उत्तर भारतीयांनी मला मतदान केले आहे. मी उत्तर भारतीयांविरोधात असतो, तर मला त्यांनी निवडूनच दिले नसते. राजकीय रंग देऊन उत्तर भारतीयविरुद्ध मराठी असा वाद पुन्हा उकरून काढला जात आहे. (प्रतिनिधी)