शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

आयुक्तांची पाठ फिरताच फेरीवाले रस्त्यांवर; कल्याण-डोंबिवलीतील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 11:36 PM

केडीएमसीची कारवाई केवळ दिखावा असल्याची नागरिकांची टीका

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आयुक्त गोविंद बोडके गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. मात्र, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पुन्हा तेथे फेरीवाले बसलेले दिसले. त्यामुळे फेरीवाल्यांच्या विरोधातील महापालिकेची कारवाई म्हणजे ‘येरे माझ्या मागल्या’ असल्याचा प्रत्यय नागरिकांना आला.

कल्याण-डोंबिवलीतील स्टेशन परिसर व महत्त्वाचे रस्ते फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत. फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी स्वतंत्र दोन वाहने कल्याण व डोंबिवलीतील पथकांना दिली आहेत. मात्र, कारवाई पथकाकडून दररोज कारवाई होत नाही. त्यामुळे फेरीवाल्यांवर पथकाचा वचक नाही. डोंबिवलीत स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांमध्ये जागेवरून हाणामारी झाली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेमुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आयुक्तांना जमत नसेल तर त्यांनी बदली करून घ्या, असा सल्ला दिला. त्यामुळे बोडके यांनी गुरुवारी कल्याणमध्ये रस्त्यावर उतरून फेरीवल्यांविरोधात कारवाई केली. मात्र, त्यांची पाठ फिरताच काही भाजीविक्रेते लगेच रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. अनेकांचा माल जप्त केल्यावरही फेरीवाल्यांनी शुक्रवारी पुन्हा पथारी पसरल्याचे दिसून आले.

फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई केवळ फार्स असल्याची चर्चा होत आहे. आयुक्तांनी कारवाईत सातत्य ठेवले जाईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात शुक्रवारी स्टेशन परिसरात फेरीवाले बसले असतानाही त्यांच्याविरोधात कारवाई केली गेली नाही. तोच प्रकार डोंबिवली स्टेशन परिसरात दिसून आला. लोकसभा निवडणुकीच्या काळात डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविले होते. मात्र निवडणूक संपताच डोंबिवली स्टेशन परिसरात पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान बसविले. निवडणुकीच्या कामात कर्मचारी व्यस्त असल्याने फेरीवाला कारवाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याची कबुली स्वत: आयुक्तांनी दिली होती. आता आचारसंहिता संपल्याने कारवाईस वेग येणे अपेक्षत होते. मात्र, तसे झाले नाही. कारवाईचा जोश फक्त आयुक्तांच्या उपस्थितीतच दिसून आला.‘... तर जाब विचारणार’कल्याण न्यायालयाच्या संरक्षक भिंतीस लागून असलेल्या दुकानदारांच्या दुकानांचे पुढे आलेले पत्रे गुरुवारी तोडण्यात आले. ही कारवाई चुकीची असल्याचे सांगत दुकानदारांनी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी भोईर म्हणाले की, ‘महापालिकेची कारवाई चुकीची असल्यास महापालिकेस जाब विचारला जाईल.’

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका