ठाण्यातील अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी केले खांदेपालट: चार अधिकाऱ्यांना वरिष्ठ निरीक्षकाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 01:06 IST2021-09-04T01:04:28+5:302021-09-04T01:06:01+5:30

आता वर्तकनगर येथे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे सदाशिव निकम यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. निकम यांच्यासह चार अधिकाºयांना आता वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे.

Commissioner of Police reshuffles Thane officers: Four officers have senior inspector responsibilities | ठाण्यातील अधिकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी केले खांदेपालट: चार अधिकाऱ्यांना वरिष्ठ निरीक्षकाची जबाबदारी

सदाशिव निकम यांना वर्तकनगरची जबाबदारी

ठळक मुद्देसदाशिव निकम यांना वर्तकनगरची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: महिनाभरापूर्वीच डान्स बार प्रकरणात प्रथम दर्शनी दोषी आढळल्यामुळे तसेच कर्तव्यात कसूरी केल्यामुळे नौपाडा आणि वर्तकनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता नौपाडा वगळता वर्तकनगर येथे वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे सदाशिव निकम यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. निकम यांच्यासह चार अधिकाºयांना आता वरिष्ठ निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे.
ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी गुरुवारी काढलेल्या आदेशानुसार विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांना हिललाईन पोलीस ठाण्यात संधी दिली आहे. तर वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांना पुन्हा प्रशासनाची जबाबदारी सोपविली असून वर्तकनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची धूरा निकम यांच्याकडे सोपविली आहे. गुन्हे शाखेचे चेतन काकडे यांना भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तर राबोडी पोलीस ठाण्याचे पंढरीनाथ भालेराव यांना विष्णुनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
* घाटेकर यांना औटघटकेची संधी-
वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना डान्स बार प्रकरणावरुन निलंबित केल्यानंतर त्याच पोलीस ठाण्याचे प्रशासन सांभाळणारे निरीक्षक संतोष घाटेकर यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची संधी देण्यात आली होती. परंतू, आता त्याठिकाणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या निकम यांची नियुक्ती केल्यामुळे घाटेकर यांचा कार्यकाळ औटघटकेचा ठरला आहे.

Web Title: Commissioner of Police reshuffles Thane officers: Four officers have senior inspector responsibilities