महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 22:52 IST2019-08-15T22:52:23+5:302019-08-15T22:52:29+5:30

मोनिका शिवदास केणे ( १९ ) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली

College student commits suicide by jumping from building | महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून केली आत्महत्या

महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून केली आत्महत्या

डोंबिवली : सोनारपाडा गावात असलेल्या ओशियाना प्लाझा इमारतीमध्ये राहणाऱ्या मोनिका शिवदास केणे ( १९ ) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मोनिका हिने इमारतीच्या टेरेसवरून स्वतःला झोकून दिले. यात ती गंभीर स्वरूपात जखमी झाली. तिला जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री १० च्या सुमारास मोनिकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अभिजीत याने दिलेल्या माहितीनुसार मानपाडा पोलिसांनी नोंद केली आहे. मोनिकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Web Title: College student commits suicide by jumping from building