शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

कलेक्शन करणे हे केडीएमसीच्या अतिक्रमण हटाव पथकाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 4:46 PM

न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवणा-या कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विशेषत: डोंबिवली पूर्वेला, ठाकुर्ली स्थानक परिसरासह जागा मिळेल तिथे फेरिवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्याला फ प्रभाग अधिका-यांचे अभय असून महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हे केवळ ‘कलेक्शन’चे काम करते. त्यामुळे तुटपुंजी कारवाई हा केवळ दिखावा असून त्यात अधिका-यांसह सगळयांचच चांगभल होत असल्याची टीका फ प्रभागसमितीच्या बैठकीत नगसेवकांनी केली.

ठळक मुद्दे प्रभाग समिती बैठकीत नगसेवकांचा आरोप वेदपाठशाळेच्या प्रस्तावाला एकमताने मंजूरी

डोंबिवली: न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवणा-या कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विशेषत: डोंबिवली पूर्वेला, ठाकुर्ली स्थानक परिसरासह जागा मिळेल तिथे फेरिवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्याला फ प्रभाग अधिका-यांचे अभय असून महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हे केवळ ‘कलेक्शन’चे काम करते. त्यामुळे तुटपुंजी कारवाई हा केवळ दिखावा असून त्यात अधिका-यांसह सगळयांचच चांगभल होत असल्याची टीका फ प्रभागसमितीच्या बैठकीत नगसेवकांनी केली.गुरुवारी महापालिकेच्या उपइमारतीमध्ये घेण्यात आलेल्या सभेमध्ये फेरिवाला प्रश्नासंदर्भात ठाकुर्लीच्या नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी सपशेल नाराजी व्यक्त करत यासंदर्भात प्रभागक्षेत्र अधिकारी अमित पंडित हे जबाबदार असून ते कार्यक्षम नसल्याचे म्हंटले. ठाकुर्लीमधील संतवाडी परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील असतांनाच आता फेरीवाले बसतात त्यामुळे त्यात भर पडत असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. ते नगरसेविकेला जाब विचारतात, त्यामुळे महापालिकेच्या नाकर्तेपणाचा फटका आम्हाला बसत असल्याची टिका चौधरी यांनी केली. चौधरी यांचे म्हणणे योग्य असून फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे सांगत कलेक्शन साठी सगळे सुरु असल्याची टिका नगरसेवक विश्वदीप पवार, निलेश म्हात्रे, राजन आभाळे यांनी केली. संदीप पुराणिक यांनीही गेल्या महिनाभरात किती फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली हे सांगावे असे म्हंटल्यावर मात्र लेखी, दंडात्मक कारवाई केली नसल्याचे उघडकीस आले. त्याची दखल घेत गुरुवारपासून कारवाई करणार असल्याचे आश्वासन पंडित यांनी दिले. पण त्यात सातत्य हवे असा आग्रह प्रमिला चौधरी यांनी धरला. जसे पथक मिळेल तशी कारवाई होणार असल्याचे पंडित म्हणाले. त्यामुळे संतापलेले नगरसेवक म्हणाले की, पश्चिमेला स्थानक परिसरात एकही फेरीवाला बसत नाही, तेथे जर कारवाई होऊ शकते तर पूर्वेला का नाही असा सवाल केला. पथक निरिक्षक कमी असून त्यातील मनुष्यबळ अल्प असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले, पण ते ही न पटणारे असल्याचे पवार म्हणाले. डोंबिवली स्थानक परिसरात प्रचंड सावळागोंधळ आहे, पण ठाकुर्ली परिसरातही फेरीवाले आहेत तेथेही कारवाई का केली जात नाही असा सवाल सभापती खुशबु चौधरी यांनी केला. कारवाई हवीच अशी भूमिका त्यांनी घेतली. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात सिग्नल यंत्रणा राबवावी असे आभाळे म्हणाले, त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत त्याची रचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण अधिका-यांनी दिली.वेदपाठशाळेच्या प्रस्तावाला एकमताने मंजूरी :* केडीएमसी ही राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणुन ओळखली जाते. त्यासाठी या शहरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ‘वेदपाठ’शाळेची मागणी सातत्याने होत आहे. पुढील पिढीला वेद व त्याचे अध्ययन याची माहिती व्हावी, तसेच वेद ज्यांना शिकायचे आहेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी. यासाठी वेद्पाठ शाळेचा प्रस्ताव नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य संदीप पुराणिक यांनी मांडला. त्या प्रस्तावाला सभापती खुशबू चौधरी, नगसेविका प्रमिला चौधरी, साई शेलार, विश्वदीप पवार, निलेश म्हात्रे आदींनी एकमताने मंजूरी दिली. आगामी काळात तो स्थायी समितीच्या पटलावर पाठवावा असेही ठरले. त्यास सूचक म्हणुन पुराणिक, आणि अनुमोदक म्हणुन राजन आभाळे यांनी बाजू मांडली होती. तसेच त्या प्रस्तावाची प्रत महापालिका सचिवांना पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता -डोंबिवली सुभाष पाटील यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली