शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील कॉफी टेबल पुस्तकास राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 5:04 PM

ठाणे महापालिकेला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत गौरविण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांच्या कामगिरीचा चित्रमय आढावा घेणाऱ्या  कॉफी टेबल बुक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देजनसंपर्क विभागाला कम्युनिकेटर्स आॅफ दि डिकेडचा पुरस्कार

ठाणे - ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कामिगरीचा चित्रमय आढावा घेणाऱ्या  ‘संजीव जयस्वाल- मॅन आॅन मिशन’ या कॉफी टेबल पुस्तकास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुस्तकास सन २०१६ मधील सर्वोत्कृष्ट प्रकाशनाचा मान मिळाला आहे. तर जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखन्ीाय कामिगरी केल्याबद्दल संदीप माळवी यांना ‘कम्युनिकेटर्स आॅफ दि डिकेड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हॉटेल ताज येथे संपन्न झालेल्या एका भव्य संमारंभात केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या एक्पोर्ट क्र ेडिट गारंटी कार्पोरेशनच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका गीता मुरलीधर यांच्या शुभहस्ते आणि स्टेट बँक आॅफ इंडियाचे महाप्रबंधक विवेक साहनी, टीआरएल क्रोसाकी लि. या कंपनीचे भारतातील प्रमुख अशोक त्रिपाठी यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी हे पुरस्कार स्वीकारले.दरवर्षी असोशिएशन आॅफ बिझनेस कम्युनिकेटर्स आॅफ इंडिया या संस्थेच्यावतीने जनसंपर्क आणि संज्ञापन क्षेत्रात उल्लेखिनय काम करणाºया संस्था आणि व्यक्तींचा एबीसीआय पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. गेली ६२ वर्षे ही संस्था या क्षेत्रात काम करीत असून संस्थेचे पुरस्काराचे हे ५२ वे वर्ष आहे.यावर्षी नामांकित प्रकाशन या गटात देशभरातून आलेल्या एकून ४० प्रकाशनांमधून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील ‘संजीव जयस्वाल अ मॅन आॅन मिशन’ या पुस्तकाची निवड करून त्यास राष्ट्रीय सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय कामिगरी केल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना ‘कम्युनिकेटर आॅफ दी डिकेड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी बल्गेरियाचे हिल अँड नॉलटन या पीआर कंपनीचे चेअरमन माक्सिम बेहार आणि टीसीएसचे माजी उपाध्यक्ष प्रदीप्ता बागची यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर ‘वॉल पेपर’ या गटात महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या डिझाईनसाठी सुवर्ण आणि अंतर्गत पाक्षिक गटात ‘उंबरठा’ या पाक्षिकास सिल्वर पुरस्कार प्राप्त झाला.या शिवाय ब्लूमर्ग टेलिव्हिजन इंडियाच्या राष्ट्रीय संपादिका स्वाती खंडेलवाल ‘प्रामिसिंग बिजनेस कम्युनिकेटर,’ इंडियन आॅईलचे कार्यकारी संचालक(जनसंपर्क) सुबोध डाकवाले यांना ‘कम्युनिकेटर आॅफ दि इयर,’ ‘चार शहजादे’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाचे निर्माते प्रसाद आजगावकर यांना ‘कम्युनिकशन लिडर चेंज मॅनेजमेंट,’ समाजिक संस्थात्मक बांधिलकीसाठी एल अँड टी या कंपनी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दरम्यान अ‍ॅड गुरू म्हणून परिचित असलेले अभिनेते भरत दाभोळकर यांना आणि ‘दि परफेक्ट मर्डर,’ ‘इंग्लिशिवग्लिश’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कार्पोरेट इमेज फिल्ममेकर म्हणून परिचित असलेले हिंदी चित्रपट दिग्दर्शक जफर हाय यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त