शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बंद घरे चोरट्यांच्या ‘रडारवर’

By admin | Updated: May 22, 2017 01:54 IST

सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेली अथवा कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मंडळींची घरे आता चोरट्यांच्या ‘रडावर’ आहेत. चोरट्यांनी कल्याण आणि ठाकुर्लीत मागील

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : उन्हाळ््याच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेली अथवा कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मंडळींची घरे आता चोरट्यांच्या ‘रडावर’ आहेत. चोरट्यांनी कल्याण आणि ठाकुर्लीत मागील दोन दिवसांत पाच घरेफोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरातील ओम गणेश सोसायटीत राहणारे गणेश रावळ हे शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घराबाहेर गेले. ते सायंकाळी परतल्यानंतर घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी कुलूप तोडून टीव्ही, मोबाइल, घड्याळ असा १९ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी रावळ यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना कल्याण पूर्वेतील तीसगाव कमानीजवळ न्यू गंगातीर्थ सोसायटीत घडली. तेथील एक महिला शनिवारी बाहेर गेली. चोरट्यांनी तिचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून एक लाख ९१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ती सायंकाळी घरी परतताच चोरीचा प्रकार पाहून तिला धक्काच बसला. तिने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. तिसरी घटनेत सुनील कुमार यादव (रा. पिसवली) हे शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास घराबाहेर पडले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे-चांदीचे दागिने, घड्याळ व रोकड मिळून ४६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी यादव यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस पुढील तपास करत आहेत.चौथी घटना ठाकुर्लीत घडली आहे. अर्थव चाळके (रा. अंकिता अपार्टमेंट) हे गुरुवारी रात्री घराबाहेर गेले. ते शनिवारी परतल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा दरवाजा फोडून घरातील तीन मोबाइल आणि एक सोन्याची चेन असा ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अथर्व यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.