शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

पुन्हा वाढले साथीचे रूग्ण, डेंग्यू, मलेरिया आटोक्यात आल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 3:05 AM

डोंबिवली : बदलत्या हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला आणि श्वसनाच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.

अनिकेत घमंडी डोंबिवली : बदलत्या हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला आणि श्वसनाच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, पावसाळ्याच्या मोसमाच्या तुलनेत डोंबिवलीत डेंग्यू, मलेरियाच्या तापाचे रुग्ण आटोक्यात आल्याचा दावा केडीएमसीच्या पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासनाने केला आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात शुक्रवारी सकाळी ५०० नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यात श्वसनाच्या आजारांचे रुग्ण सर्वाधिक होते. त्याचबरोबर जुने १५० रुग्ण, महापालिकेचे कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक असे ५० रुग्ण असे सरासरी दिवसाला ७०० रुग्ण औषधोपचाराचा लाभ घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. खाजगी दवाखान्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत.थंडीची चाहूल लागत असतानाच सोमवारी पाऊस पडला. त्यानंतर, दोन दिवस ढगाळ वातावरण होते. हवेतील आर्द्रता वाढल्याने वाढलेल्या उकाड्याचा नागरिकांना सामना करावा लागला. बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे गारवा जाणवला. झपाट्याने बदलणाºया हवामानामुळे सर्दीचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच शहरातील रस्त्यांवरील धूळ आणि प्रदूषण यामुळेही श्वसनाचे विकार होत आहेत. अनेक जण कफ, खोकला, उलट्या अशा आजारांनी बेजार आहेत. लहान मुले व वयोवृद्धांना या आजारांचा त्रास होत आहे.शहरात पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. डोंबिवली पश्चिमेतील काही ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आहेत. मात्र, ही साथ आटोक्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाºयांचे म्हणणे आहे. डेंग्यूची साथ पसरू नये, यासाठी जागृती सुरू आहे. धूरफवारणीही केली जात आहे. त्यामुळे साथरोगांचे प्रमाण नियंत्रणात आहे. काविळीच्या रुग्णांचे प्रमाणही नसल्याचे सांगण्यात आले.>श्वानदंशाचेही दररोज १० ते १२ रुग्णश्वानदंशाचे दिवसाला १० ते १२ नवे रुग्ण उपाचारासाठी येतात. अधिक उपचार, औषधोपचार व नव्या रुग्णांसह दिवसाला श्वानदंशाचे ५० रुग्ण येतात. रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक ५० लस उपलब्ध होत्या. याखेरीज, साठा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सर्पदंशाचीही लस येथे उपलब्ध आहे.डोंबिवली शहरात डेंग्यूची साथ आटोक्यात आली आहे. चार दिवसांत सर्दी-पडसे, श्वसनाच्या विकारांचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी आले आहेत. दिवसाला ७०० रुग्ण हे नित्याचे आहेत.- राजू लवंगारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, शास्त्रीनगर रुग्णालय, केडीएमसी

टॅग्स :thaneठाणेdengueडेंग्यू