शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शहर अभियंता जयस्वालांना पदमुक्त करा

By admin | Updated: May 16, 2017 00:07 IST

शहर अभियंता रामप्रसाद जयस्वाल हे काम करत नसल्याचा ठपका ठेवत त्यांना पदमुक्त करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपाने आगामी महासभेत ठेवला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहर अभियंता रामप्रसाद जयस्वाल हे काम करत नसल्याचा ठपका ठेवत त्यांना पदमुक्त करण्याचा ठराव सत्ताधारी भाजपाने आगामी महासभेत ठेवला आहे. तसेच प्रभारी कार्यभार न देता अधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी पदभार द्यावा, अशी मागणी केली आहे. यावरून सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा सामना रंगणार अशी चिन्हे आहेत. दरम्यान, प्रस्ताव नियमानुसार असेल तरच त्याची अंमलबजावणी होईल, असे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सांगितले. शहरात विकासकामे ठप्प पडली आहेत. अशा वेळी सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी व मीना सोंडे यांनी काही अधिकाऱ्यांना प्रभारी पदभाराऐवजी कायमस्वरूपी नियुक्ती करण्याचा व शहर अभियंता जयस्वाल यांना पदमुक्त करण्याचा प्रस्ताव आणला आहे. तसेच ठोस वेतनधारक कर्मचाऱ्यांना कायस्वरूपी नियुक्त करण्याचा प्रस्ताव महासभेत आला. गुरुवारी महासभा होणार असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जयस्वाल यांनी १० लाखांपेक्षा कमी बिलाचा प्रकार आयुक्तांसमोर मांडल्याने वादाला तोंड फुटले आहे.कॅम्प नं-५, वाल्मीकीनगर परिसरात श्रमसाफल्य योजनेच्या नावाखाली तीन इमारती बांधल्या आहेत. यातील १८० घरांची मालकी सफाई कामगारांना देण्याला पालिकेने विरोध केला आहे. बीएसयूपी व श्रमसाफल्य योजनेंतर्गत आलेला निधी पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे व तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या अनास्थेमुळे परत गेला. तिन्ही इमारती पालिकेने स्वत:च्या निधीतून बांधल्याचे उघड झाले आहे. तसेच खेमानी नाला वळवण्याचे काम ठप्प पडले आहे. ३०० कोटींची योजना राबवूनही पाणीटंचाई कायम आहे. रस्ताबांधणी, अंबरनाथ-कल्याण रस्त्याची पुनर्बांधणी, कचऱ्याचे कंत्राट आदी अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्या सोडण्याऐवजी महासभेत कायमस्वरूपी व अधिकारी हटाव यासारख्या प्रस्तावाबद्दल विरोधी पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.