शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

नगरविकास विभागाने छाटले सिडकोचे पंख! नैनाचे क्षेत्र झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 05:48 IST

नगरविकास विभागाने अखेर नैना अधिसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या खालापूर तालुक्यातील ३० गावांच्या नियोजनाचे सिडकोकडील अधिकार काढून ते आधी ठरल्यानुसार रस्तेविकास महामंडळाने सुुपुर्द केले आहेत

- नारायण जाधवठाणे : नगरविकास विभागाने अखेर नैना अधिसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या खालापूर तालुक्यातील ३० गावांच्या नियोजनाचे सिडकोकडील अधिकार काढून ते आधी ठरल्यानुसार रस्तेविकास महामंडळाने सुुपुर्द केले आहेत, तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ-कुळगाव-बदलापूर अधिसूचित क्षेत्रातील पूर्वी नवी मुंबई पालिकेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेल्या १४ गावांच्या नियोजनाचे अधिकार सिडकोकडून एमएमआरडीएकडे सोपविले आहेत.मुंबई-पुणे एक्स्पे्रस वेच्या दोन्ही बाजूंकडील २ किमी परिघातील नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्रात मोडणाºया खालापूर तालुक्यातील ३० गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाची यापूर्वीच १७ फेबु्रवारी, २०१६ची नियुक्ती केली होती. मात्र, त्याच्या नियोजन प्राधिकरणाबाबतची अधिसूचना काढलेली नव्हती, परंतु आता नैनाच्या दुसºया टप्प्यातील विकास योजनेस गेल्या आठवड्यात मंजुरी दिल्यानंतर, नगरविकास विभागाने खालापूर तालुक्यातील त्या ३० गावांचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाची नियुक्ती करण्याची अधिसूचना अखेर १९ सप्टेंबर रोजी काढली आहे.‘त्या’ १४ गावांचा फुटबॉलठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ-कुळगाव-बदलापूर अधिसूचित क्षेत्रातील ठाणे शहराला लागून असलेल्या १४ गावांचा समावेश यापूर्वी एमएमआरडीएकडून १९९२ साली नवी मुंबई महापालिकेत करण्यात आला होता. त्या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेने आरोग्य रुग्णालयासह स्मशानभूमी, रस्ते, परिवहनसेवेसारख्या सुविधा पुरविल्या. येथून दोन नगरसेवकही महापालिकेत निवडून आले होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे ही गावे वगळण्यात आली. मात्र, नंतर ती पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली, परंतु पुन्हा वगळली. त्यानंतर कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील २७ गावे आणि १४ गावे मिळून स्वतंत्र महापालिकेची मागणी होऊ लागली. मात्र, नैनाच्या अधिसूचनेनंतर या गावांचा कारभार सिडकोकडे देण्यात आला, परंतु आता पुन्हा नियोजनाचे अधिकार एमएमआरडीएकडे दिले आहेत.३० गावे एमएसआरडीसीकडेनैनातील ज्या ३० गावांचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाकडे कारभार सोपविण्यात आला आहे, त्या ३० गावांमध्ये पराडे, मोरबे, नादोडे, नवांधे, निगडोली, पाली बुद्रुक, विनेगाव, भिलवळे, घोडीवली, कलोते-मोकाशी, कलोते-रायती, कन्ड्रोलीतर्फे वनखळ, अंजरुण, बोरगाव बुद्रुक, पडघे, वावरले, सोंडेवाडी, वरोसेतर्फे वनखळ, नानिवली, वडविहीर, बोरगांव खुर्द, शेनगाव, डोलिवली, मानकिवली, तिघर, नांगुर्ले, वळणे, आवरस, पळसदरी, तळवली यांचा समावेश आहे. 

टॅग्स :cidcoसिडकोMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार