नागरिक स्वतःसह देशाला करतात डॅमेज: पोलीस अधिकारी समीर वानखडे

By सदानंद नाईक | Published: October 16, 2023 06:17 PM2023-10-16T18:17:56+5:302023-10-16T18:19:07+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-५, नेताजी शाळेतील मुला मध्ये विविध स्पर्धात्मक परीक्षाबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून समाजसेवक शंकर सोनेजा यांनी पोलीस अधिकारी समीर वानखडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.

citizens do damage to the country along with themselves said police officer sameer wankhede | नागरिक स्वतःसह देशाला करतात डॅमेज: पोलीस अधिकारी समीर वानखडे

नागरिक स्वतःसह देशाला करतात डॅमेज: पोलीस अधिकारी समीर वानखडे

सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-५, नेताजी शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस अधिकारी समीर वानखडे यांनी यूपीएससी, एमपीएससी स्पर्धात्मक परिक्षेबाबत माहिती दिली. तसेच ड्रगिस्ट नागरिक स्वतःसह देशाला डॅमेज करीत असल्याचे प्रतिपादन केले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-५, नेताजी शाळेतील मुला मध्ये विविध स्पर्धात्मक परीक्षाबाबत मार्गदर्शन मिळावे म्हणून समाजसेवक शंकर सोनेजा यांनी पोलीस अधिकारी समीर वानखडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. यावेळी महापालिका आयुक्त अजीज शेख उपस्थित होते. एमपीएससी, यूपीएससी यांच्यासह विविध स्पर्धात्मक परीक्षेची पूर्वतयारी, अभ्यासाची पद्धत, वेळेचे नियोजन आदीची माहिती व मार्गदर्शन पोलीस अधिकारी समीर वानखडे यांनी दिली. तसेच तरुण-तरुणी मध्ये नशेखोर व ड्रग्ज सेवनाच्या प्रमाणात वाढ झाली असून मी गेली दोन वर्षे याबाबत तपास करीत आहे. ड्रगिस्ट नागरिक स्वतःसह देशाला डॅमेज करीत असल्याचे त्यांनीं यावेळी सांगितले. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनीही मुलांना स्पर्धात्मक परिक्षेबाबत यावेळी मार्गदर्शन केले आहे.

 पोलीस अधिकारी समीर वानखडे यांनी चालिया उत्सव दरम्यान चालिया मंदिरात येऊन दर्शन घेतले होते. तसेच नागरिकांनी बोलविल्यास मी उल्हासनगर मध्ये येईल. असा शब्द दिला होता. नेताजी शाळेतील मुलांना यूपीएससी, एमपीएससीसह विविध स्पर्धात्मक परिक्षेबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी समीर वानखडे शनिवारी शहरात आले होते. कार्यक्रमाचे आयोजक शंकर सोनेजा होते. तर यावेळी महापालिका आयुक्त अजीज शेख, भाजपा नेते नरेश तहेलरामानी यांच्यासह शहरातील नामांकितानी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शहरातील समाज उपायोगी कार्यक्रमाला बोलविल्यास नक्की येणार असल्याचे मत यावेळी समीर वानखडे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: citizens do damage to the country along with themselves said police officer sameer wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.