शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

नागरीकांच्या सतर्कतमेमुळे तीन वर्षाच्या मुलाचा अपहरणाचा फसला बेत, पोलिसांकडून गुन्हेगारास ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 17:39 IST

शहराच्या पूर्व भागातील 90 फीट रोडवर एका तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न नशाबाजाने केला होता. नागरीकांच्या सतर्ककतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

डोंबिवली, दि. 18 - शहराच्या पूर्व भागातील 90 फीट रोडवर एका तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न नशाबाजाने केला होता. नागरीकांच्या सतर्ककतेमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. मात्र रामनगर पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न करणा:या नशाबाजाला व्हीआयपी ट्रीटमेंट देत जागरुक नागरीकांनी त्याच्या विरोधात तक्रार न देण्याचा अजब सल्ला दिल्याने जागरुक नागरीक ही चक्रावून गेले. अखेरीस रात्री उशिरा पोलिसांनी नशाबाजाच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      अभिषेक भगत हे  रेल्वेत कामाला आहेत. ते कामानिमित्त मध्यप्रदेशात असतात. त्यांचे राहते घर डोंबिवलीत आहे. त्यांना तीन व सात वर्षाचे दोन मुलगे आहेत. ते काल सुट्टीनिमित्त घरी आले होते. पत्नी व दोन मुलांसह ते काल रात्री घराबाहेर पडले होते. त्याच्या तीन वर्षाच्या मुलाला एका नशाबाजाने उचलून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही लोकांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला. अभिषेक यांनी नशाबाज अपहरणकत्र्याचा पाठलाग केला. तेव्हा नशाबाजाने त्याच्याजवळ असलेल्या काठीने प्रहार करुन अभिषेकला प्रतिकार केला. नशाबाज नशेत असल्याने त्याला पळता येत नव्हते. अखेरीस नागरीकाच्या मदतीने त्याला पकडून चांगलाच चोप देण्यात आला. भगत यांच्या मदतीसाठी खाजगी कंपनीत कामाला असलेले किरण हर्डीकर व त्यांचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते दीपक मेहता यांनीही धाव घेतली. पोलिसांनी भगत यांच्यासह मुलाला घेऊन पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. मुलाला घेऊन पोलिस ठाण्यात गेल्यावर पोलिस एक तासानंतर नशाबाजाला घेऊन आले. भगत यांची मुले कंटाळून उपाशीच झोपली. मात्र तक्रारदाराची विचारपूस करण्याऐवजी पोलिसांनी नशाबाजाला फ्राईड राईस खाण्यास दिला.

नशाबाज फिर्यादीला पोलिस ठाण्यात धमकावित होता की, त्याचे पोलिस काहीच वाकडे करु शकत नाहीत. तर फिर्यादी काय करणार असा दम भरला. पोलिसांनी त्याला काही एक मज्जाव केला नाही. पोलिसांनी रात्री उशिरा नशाबाजाचा विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा नंबर केवळ फिर्यादीला दिला. नशाबाजाचे नाव सांगण्यास नकार दिला. पोलिस गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करीत होते. तसेच सुज्ञ नागरीक असाल तर तक्रार देऊ नका. सारखे जबाब देण्यासाठी व नंतर न्यायालयात यावे लागेल. याल का असा प्रतिसवाल देऊन तक्रार देण्यापासून परावृत्त करीत होते. हा प्रकार पाहून फिर्यादी अजब झाले. तसेच मिडीयाकडे जाऊ नका असा अनाहूत सल्लाही पोलिस फिर्यादी व जागरुक नागरीकांना देत होते. या प्रकरणी पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी फकडलेला आरोप मनोरुग्ण आहे.

त्यामुळे तो त्याचे नाव नीट सांगू शकत नाही. पोलिसांच्या मते तो मनोरुग्ण आहे. तर त्याने फिर्यादीला पोलिस माङो काहीच वाकडे करु शकत नाही असा दम कसा व कोणत्या हुशारीच्या आधारे भरला असा प्रश्न उपस्थित होते. काही दिवसापूर्वी कल्याण खडकपाडा परिसरात अशाच एका नशाबाज आरोपीला मुलीचे अपहरण करताना नागरीकांनी पकडून दिले होते. त्याचीच पुनर्रावृत्ती डोंबिवलीत घडली आहे. नागरीक गुन्हा रोखण्यासाठी स्वत:हून पुढे येत नाहीत. आले तर सतर्क नागरीकांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नाही. हेच पुन्हा एकदा डोंबिवलीच्या उपरोक्त घटनेतून उघड झाले आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा