शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

चितळे यांचे दुकान यापुढे दिवसभर उघडे राहणार

By admin | Updated: May 16, 2017 00:11 IST

माझ्या आजोबांना दुधाचा आणि दुकान चालवण्याचा हे दोन्ही व्यवसाय सांभाळावे लागले. त्यामुळे पहाटेपासून दुपारी २ पर्यंत आणि दुपारी ३ वाजल्यापासून रात्रीपर्यंत त्यांना काम करावे लागत होते

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : माझ्या आजोबांना दुधाचा आणि दुकान चालवण्याचा हे दोन्ही व्यवसाय सांभाळावे लागले. त्यामुळे पहाटेपासून दुपारी २ पर्यंत आणि दुपारी ३ वाजल्यापासून रात्रीपर्यंत त्यांना काम करावे लागत होते. दुकानातील कामगार दुधाची, पेपरची लाइन टाकून कामावर यायचे. त्या कामगारांना विश्रांती मिळावी आणि त्यांची काम करण्याची क्षमता वाढावी, म्हणून चितळेंचे दुकान दुपारी १ ते ४ बंद असते, असे उत्तर चितळे उद्योगसमूहाचे इंद्रनील चितळे यांनी रविवारी दिले. डेक्कन येथे सुरू झालेले दुकान लवकरच १२ तास सुरू राहील तर ठाणे, मुंबईत शाखा सुरू झाल्यावर या ठिकाणीही चितळेंचे दुकान दुपारी १ ते ४ या वेळेत बंद न राहता १२ तास सुरू राहील, असेही त्यांनी जाहीर केले. ‘इंद्रधनू’च्या वतीने रविवारी सरस्वती क्रीडा संकुल सभागृहात विश्वास, अंजली आणि इंद्रनील चितळेंशी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम पार पडला. या वेळी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांना बोलते केले. ‘चितळ्यांच्या गायी-म्हशी खरंच तिप्पट दूध देतात का’, ‘चितळ्यांचे दुकान दुपारी १ ते ४ बंद का असते’, ‘चितळ्यांच्या बाकरवडीच्या खुसखुशीतपणाचं रहस्य काय?...’ अशा एक ना अनेक खुसखुशीत प्रश्नांचा भडीमार केला. काही प्रश्नांनी व त्यावरील उत्तरांनी उपस्थितांना पोट धरून हसवले. चितळे हे ठाणेकर आणि पुणेकर खवय्यांमुळे उभे आहेत. आजोबांनी भिलवडीमध्ये दुधाचा व्यवसाय सुरू केला. पहिल्यांदा दूध विकायला मुंबईत आले, परंतु काही अडचणींमुळे हा व्यवसाय पुण्यात सुरू केला. भिलवडीमध्ये उत्पादन आणि पुण्यात विक्री असा आमचा उद्योग १९३९ मध्ये सुरू झाला, असे विश्वास यांनी सांगितले. आम्ही शेतकरी ते ग्राहक ही साखळी सांभाळत आलो, अशी माहिती इंद्रनीलने दिली. पुढच्या पिढीकडे जबाबदारी देताना तिला सक्षम बनवण्याचे काम चितळे कुटुंबातील महिला करीत असल्याचे सांगून अंजली म्हणाल्या, वेळ फुकट घालवायचा नाही, हा संस्कार माझ्यावर सासरी झाला. आमच्याकडे गायी-म्हशींची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची टीम आहे. प्राण्यांचे रक्ततपासणी केंद्र चितळेंनीच सुरू केल्याकडे इंद्रनील यांनी लक्ष वेधले. दिवाळीला घरचे पदार्थ खाता की दुकानातून आणता, हा प्रश्न गाडगीळ यांनी विचारला असता, विश्वास म्हणाले, घरचा लाडू-चिवडा चांगलाच, पण चेंज म्हणून दुकानातले पदार्थही आवडतात. गाय हे शेतकऱ्यांसाठी एटीएम आहे. आज चारा दिला की, उद्या दूध देते. साखरेपेक्षा जास्त पैसा हा दुधाच्या व्यवसायातून मिळतो, असे त्यांनी सांगितले.