Chimukali mass torture by displaying food bait | खाऊचे आमिष दाखवून चिमुकलीवर सामूहिक अत्याचार

खाऊचे आमिष दाखवून चिमुकलीवर सामूहिक अत्याचार

भिवंडी : खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय शाळकरी मुलावर तिघा नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांना सोमवारी गजाआड केले. अख्तर मोईनुद्दीन सैय्यद (२७, रा. शांतीनगर ), रब्बी उर्फ असरार अहमद मुस्ताक सिद्दीकी (२६, रा.अंसारनगर) आणि तबरेज उर्फ बब्बर मुस्ताक सिद्दीकी ( २३ ) ही अत्याचारी नराधमांची नावे आहेत.

शहरातील अन्सारनगर परिसरात पीडित शाळकरी मुलगा आईवडिलांसह वास्तव्याला आहे. याच परिसरात राहणाऱ्या आरोपी त्रिकुटाने पीडित मुलाला खाऊचे आमिष दाखवून त्याला नवीन बांधकाम सुरु असलेल्या कोटरगेट व पोगांव येथील वेगवेगळ्या इमारतींमध्ये आणि चाविंद्रा येथील झाडीझुडूपांत वेळोवेळी नेले. तिथे मादक पदार्थ सेवन करण्यास भाग पाडून आरोपींनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. पीडित मुलावर तीन महिन्यांपासून जबरी अत्याचार होऊ लागल्याने त्याला असहाय्य वेदना होवू लागल्या. त्याने या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर वडिलांनी मुलाला पोलिसांकडे नेले.

पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन अख्तर व रब्बी उर्फअसरार या दोघांना अटक केली. त्यांना मंगळवारी ठाण्याच्या विशेष न्यायालयाने ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या घटनेतील तिसरा आरोपी तबरेज हा फरार असून, त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास एपीआय दीपक भोई करत आहेत.

Web Title: Chimukali mass torture by displaying food bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.