ठाण्यातील जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 16:27 IST2018-01-14T16:27:41+5:302018-01-14T16:27:52+5:30

ठाणे: येथील विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अवघ्या चार तासांचे बाळ चोरीस गेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

Child theft from Thane district hospital | ठाण्यातील जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी

ठाण्यातील जिल्हा रुग्णालयातून बाळाची चोरी

ठाणे: येथील विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अवघ्या चार तासांचे बाळ चोरीस गेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. बाळाची आई मोहिनी मोहन भोवर (19, भिवंडी) हिने या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीवी फुटेजच्या आधारे बाळाचे अपहरण करणाऱ्या संबंधित महिलेचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भिवंडीच्या आदिवासीपाड्यात राहणारी ही महिला शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाली होती. तिला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुलगा झाला. पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान एका महिलेने तिच्या आईने बाळाला मागितल्याचा बहाणा करून मूल तिच्याकडून नेले. प्रत्यक्षात हे बाळ त्या महिलेने चोरल्याचे तासाभराने लक्षात आले.

Web Title: Child theft from Thane district hospital

टॅग्स :thaneठाणे