शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अहमदनगर येथून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 10:12 PM

सुमारे पाच लाख २५ हजारांच्या २० किलोच्या गांजाची तस्करी करणारा मुख्य सूत्रधार रोहिदास मोहिते याला अहमदनगर येथून ठाणे पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

ठळक मुद्दे पाच लाख २५ हजारांचा २० किलो गांजा हस्तगतयापूर्वी दोघांना अटकठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

ठाणे: गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अहमदनगर येथून रोहिदास मोहिते (५५, रा. सिरसगाव, जि. अहमदनगर) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी दुपारी अटक केली आहे. त्याच्यासह यापूर्वी अटक केलेल्या गुरुनाथ सापळे (४२) आणि मंगेश शिवणे (४०) अशा तिघांनाही २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून २० किलोचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.कल्याणच्या गोविंदवाडी बायपास येथे एका वाहनातून मोठया प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस नाईक नामदेव मुंढे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार आणि उपनिरीक्षक गिरीष गायकवाड यांच्या पथकाने १० सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गोविंदवाडी बायपास येथून संशयास्पदरित्या जाणाºया एका कारला पाठलाग करुन पकडले. या वाहनाच्या तपासणीमध्ये गुरुनाथ आणि मंगेश या दोघांना पाच लाख २५ हजारांच्या २० किलो ३८२ ग्रॅम वजनाच्या गांजासह ताब्यात घेण्यात आले. त्यांनी नाशिक येथून कल्याणमध्ये हा गांजा विक्रीसाठी आणल्याची कबूली प्राथमिक चौकशीमध्ये दिली. त्यांच्याकडून कारसह १२ लाख १४ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यांना १६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. दरम्यान, त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारे अहमदनगर येथून १५ सप्टेंबर रोजी रोहिदास मोहिते यालाही या पथकाने अटक केली. त्यानेच हा गांजा या दोघांकडे विक्रीसाठी दिला होता, अशी माहिती तपासामध्ये समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस